
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव आणि परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या – जाण्याचा जवळचा व सोयीचा असलेला चार किमी अंतराचा नाटेगाव-येसगाव रस्ता असून या रस्त्याची भयंकर दुरावस्था झाली आहे पैकी इजीमा१२ किरण कुदळे घर ते राजेंद्र मोरे घर रस्त्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे(निधी १६लक्ष), नाटेगाव ते प्ररामा ४ रस्ता ग्रामा८२मध्ये किमी ०/००ते १/५०० रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (निधी१०लक्ष)कामाचा भूमीपूजन सोहळा ११ फेब्रुवारी २०२२ रोजी मा ना आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते पार पडला असून त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम मात्र फक्त ३४०मिटरचेच करण्यात आले आहे उर्वरीत रस्त्याचे काम ठेकेदार कधी करणार असा प्रश्न नाटेगाव ग्रामस्थांना पडला आहे.
या बाबतची माहिती अशी की,नाटेगाव हे विधानसभा व लोक सभा मतदार संघातील शेवटचे गाव असून मात्र राजकीय दृष्ट्या संवेदनशील असले तरी विकास कामापासून कायम वंचित राहिलेले गाव आहे,कारण या गावाच्या साधारण तीन बाजूने येवला तालुक्याची (नाशिक) हद्द असल्याने अनेक रस्ते हद्दीच्या वादात वर्षांनुवर्षे अडकून पडले आहे.या गावाला ना येवला मतदार संघातून लाभ मिळतो,ना कोपरगाव मतदार संघातून नाटेगाव -ब्राम्हणगाव हे दोन रस्ते कोपरगाव मतदार संघात येतात, गेल्या दहा ते पंधरा वर्षापुर्वी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते, त्याचप्रमाणे मागील दोन तीन वर्षांपूर्वी नाटेगाव ब्राह्मणगाव रस्त्याचे काम माजी आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून झाले असले तरी तालुक्याच्या गावाला यायला हा मार्ग तेव्हढा सोयीचा नाही.
या रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडले असून कोणत्याही प्रकारची गाडी चालवत घेऊन जाणे शक्य राहिले नाही.तेथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते, या भागातील शेतकरी,दुध व्यवसायिक,व शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थीनींना शाळेत येणे जाणे जिकिरीचे झाले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रस्ता चांगला नसल्याने बँक, मेडिकल्स, तलाठी ऑफिस, पोस्ट ऑफिस तर नाहीच नाही परंतु साधे एखादे हॉस्पिटल सुद्धा नाही,पावसळ्यात अचानक आजारी पडलेले व्यक्तीस दवाखान्यात न्यायचे असेल तर ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही मात्र त्या रुग्णास वेळेवरऔषधोपचार मिळाले नाही तर जीव गमावण्याची वेळ येते व काहींना जीव गमावले पण आहे.
या रस्त्याच्या दुरास्थेकडे लोक प्रतिनिधीनी त्वरित लक्ष घालून मंजूर दीड किमी रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नाटेगाव ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे/होत आहे.