
संपादक- राजेंद्र तासफर
कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढुन १० मार्चला ११वर्षे पूर्ण होतील, कधी करणार विस्थापितांचे पुनर्वसन?? माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा सवाल
१) कधी देणार खऱ्या विस्थापितांना खोका शॉप,गाळे व जे राहात होते त्यांना घरासाठी जागा ???२) ज्या विकासाच्या नावावर अतिक्रमण काढले,तो विकास झालाच नाही,ना रस्ते मोठे झाले,ना गोरगरिबांना विस्थापिताना गाळे,खोका शॉप , बेघराना राहायला जागा मिळाली ३) खरच विकासासाठी अतिक्रमण काढले,मग आज अखेर सर्वे रस्ते मोठे करून रुंदीकरण होऊन,रस्त्याच्या कडेला पेविंग ब्लॉक,किंवा पाई चालणाऱ्या/शाळेतील मुलांना जाणे येणेसाठी/जेष्ठ नागरिकांना चालण्यासाठी रस्त्याचे काम कुठे झालेत ?? धूळ संपूर्ण गावभर उडत आहे.४)धारणगावं रोड, येवला रोड,बाजारतळ,बस स्टँड समोरील जागा,बैलगाडी तळ, मार्केट कमिटी समोरील रोड, इंदिरापथ,बैल बाजार रोड,बस स्टँड/खंदक नाला रोड,मच्छी मार्केट,तहसील कार्यालय लगत/पोस्ट ऑफिस मागील भागात, नदीकाठी रोड,चौक ते एम एस सी बी(mscb)ऑफिस ते कोर्ट इत्यादी अनेक भागातील छोटे दुकाने

पाडून या ठिकाणी रस्ते आहे तसेच आहे.जागा तसाच पडल्या आहे५)कधी होणार मोठे रस्ते/त्यालगत पादचारी मार्ग ?? कधी देणार छोटे खोका शॉप ?? कधी बांधणार पक्के गाळे ??? ६)आजपर्यंत विस्थापित आशेवर राहिले व नागरिक मोठे रस्ते होऊन गाव वाढेल,स्वछ होईल, धूळ मुक्त होईल या आशेवर होते.शहरातीलनागरपालिकेच्या /शासनाच्या/जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या असणाऱ्या जागेवर शॉपिंग सेन्टर कधी होतील याची वाट नागरिक बघत होते.काहीच झाले नाही ???७)खऱ्या विस्थापिततांची

होळी झाली. भेघर झाले.महिला,मुले बाळे आक्रोश करून रडत होती,कसे होणार आपले,काही गाव सोडून गेले,काही कर्जबाजारी झाले, काही मेले,काही दुसऱ्याच्या हाताखाली काम करून कसे बसे कुटुंब चालवत आहेत,याच आशेवर की कधी तरी न्याय मिळेल व आपल्याला हक्काचे खोका शॉप,गाळा मिळेल, राहायला जागा मिळेल,पक्के घर मिळेल.८) ना रस्ते मोठे झाले ना गाळे झाले ना शॉपिंग सेन्टर झाले.९)जसे टिळक नगरच्या रोड च्या बाजूने व इंदोर गेमच्या बाजूला पत्र्याचे गाळे झाले,तसे छोटे छोटे गाळे होऊ शकतात, रस्ते छोटे न होऊ देता.
खरे तर हे सर्व विस्थापित नगरपालिकेच्या आशेवर आज अखेर आहेत की काही तरी होईल,करतील व नागरिकांना वाटले की मोठे रोड होतील, साईड पट्ट्या होतील,धूळ कमी होईल,गाळे होतील,परंतु फक्त आणि फक्त निराशा या दोघांच्या पदरी पडली,आली.
दोन वर्षांपूर्वी ४/९/२०२० ला श्रमिकराज कामगार संघटने बरोबर,अजय विघे,गणेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर नगरपालिकेला निवेदन ही दिले होते.तरी अजूनही नगरपालिकेने खरे विस्थापित यांची शहानिशा करून टप्याटप्याने का होईना, जसे जिथे शक्य होईल तिथे खोका शॉप,गाळे बांधून,ज्यांची घरे गेली त्यांना राहायला जागा देऊन,या विस्थापिताना न्याय मिळवून द्यावा ही विनंती……
