Homeकोपरगावब्राह्यण सभा,कोपरगांव च्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहाने संपन्न

ब्राह्यण सभा,कोपरगांव च्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहाने संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव-दरवर्षी प्रमाणे पाच वर्षा पासुन सुरु असलेला ब्राह्मण सभा कोपरगावचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहाने संपन्न झाला.जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधीपती प.पू.रमेशगिरी महाराज तसेच प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरिय विदयालयांच्या प.पु.सरला दीदी यांचे शुभहस्ते ब्राह्मण सभा कोपरगाव दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी ब्रह्मकुमारी ईश्वरिय विद्यालयांचे प.पू.सरला दीदी यांनी ब्राह्मण सभेच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी यांचा सत्कार प.पू सरला दीदी यांचे हस्ते करण्यात आला.

या वेळेस ब्राह्मण सभा कोपरगाव अध्यक्ष मा.श्री.मकरंद कोऱ्हाळकर, उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी,सचिव सचिन महाजन,सह सचिव संदीप देशपांडे,माजी अध्यक्ष श्री.वसंतराव ठोंबरे,श्री संजीव देशपांडे,संघटक श्री महेंद्र कुलकर्णी,श्री शरद चिकटे,प्रशांत कुलकर्णी,सदाशिव धारणगावकर, अजिंक्य पदे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी खजिनदार जयेश बडवे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!