Homeकोपरगावपद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेच्या ग्राहकांनी लॉकर सुविधेचा लाभ घ्यावा-आ.आशुतोष काळे

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेच्या ग्राहकांनी लॉकर सुविधेचा लाभ घ्यावा-आ.आशुतोष काळे

पद्मविभूषण डॉ शरदचंद्रजी पवार साहेब पतसंस्थेत लॉकर सुविधा शुभारंभ प्रसंगी आ.आशुतोष काळे, चेअरमन देवेंद्र रोहमारे,व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी व संचालक मंडळ.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे कर्मचारी यांच्याबरोबरच परिसरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण करणाऱ्या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या सेवेचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकताच प्रारंभ करण्यात आला असून ग्राहकांनी या लॉकर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात खातेदार,ठेवीदार,कर्जदार यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्था आपल्या ग्राहकांना संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शना खाली विविध सेवा पुरवीत आहे.सध्या स्पर्धेचे युग असून या बदलत्या युगात सहकारी पतसंस्था क्षेत्र देखील अपवाद नाही.त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आव्हांनांना समर्थपणे तोंड देवून होणारे बदल आत्मसात करून इतर सहकारी पतसंस्थाप्रमाणे पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेने ग्राहकांना लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कर्मवीर शंकररावजी काळे साहेब सहकारी संस्थांच्या बाबतीत नेहमीच म्हणत असे की,सहकारी संस्था हे काचेचे भांडे असते.त्यामुळे सहकारी संस्था चालवतांना या काचेच्या भांड्याला कधीही तडा जाणार नाही याची काळजी घ्यायची असते.कर्मवीर शंकररावजी काळे यांनी साखर कारखाना व उद्योग समुहाची उभारणी करतांना अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली.त्यापैकी एक असलेली पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्था त्यांच्याच आदर्श विचारांवर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.संस्थेने लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शक्य असणाऱ्या सर्व सुविधा ग्राहकांना द्याव्यात अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी संचालक मंडळाला दिल्या.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन यावेळी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे,व्हा. चेअरमन रावसाहेब चौधरी,संचालक अनिलराव महाले,सुदामराव वाबळे, व्यंकटेश बारहाते,महेन्द्र काळे,वीरेंद्र शिंदे,ज्ञानेश्वर हाळनोर,तालिब सय्यद, चंद्रशेखर कडवे,भाऊसाहेब लुटे,रविंद्र निकम,व्यवस्थापक मंगेश देशमुख, त्यांचे सहकारी तसेच ठेवीदार,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!