Homeकोपरगावकुंभारी ग्रामपंचायत सदस्य पदी सौ.कविता निळकंठ यांची निवडीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

कुंभारी ग्रामपंचायत सदस्य पदी सौ.कविता निळकंठ यांची निवडीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार


अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा कोपरगाव तालुक्यातील वीरशैव लिंगायत व जंगम समाजाच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या वीरशैव लिंगायत समाजातील महिलेची कुंभारी गावातील ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाली.ही बाब वीरशैव लिंगायत समाजासाठी कौतुकास्पद असून निळकंठ परिवाराचे हे यश म्हणजे या गावातील इतर समाजासोबत जपलेली सामाजिक बांधिलकी व सांस्कृतिक,धार्मिक, सामाजिक दृष्ट्या निळकंठ परिवाराला मिळालेल्या कामाची पावती असल्याचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत सौ.कविता ललित निळकंठ यांची भरघोस मतांनी निवड होऊन सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ कोपरगाव शहरातील ‘समता स्टडी पॉईंट’ अभ्यासिका उद्घाटन सोहळ्यानिमित्त आले असता त्यांनी समता नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली.प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात सौ.कविता ललित निळकंठ यांचा सत्कार करण्यात आला.त्या वेळी ते बोलत होते.

लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा सत्कार करण्यात आला.तसेच प्रांत अधिकारी माणिक आहिरे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचा सत्कार समता पतसंस्थेचे संचालक जितूभाई शहा यांनी केला.

या वेळी विभागीय प्रांत अधिकारी माणिक आहिरे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे समन्वयक काका कोयटे,प्रदीप साखरे,गोपीनाथ निळकंठ,संदीप कोयटे, गिरीश सोनेकर,ललित निळकंठ,सतीश निळकंठ,अमोल राजूरकर,अशोक निळकंठ,अतुल निळकंठ,राहुल निळकंठ,प्रतिक निळकंठ,बबलू तळे,सौ. सुवर्णा निळकंठ आदींसह मोठ्या संख्येने वीरशैव लिंगायत व जंगम समाज बांधव,हितचिंतक यांनी उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!