Homeकोपरगावदेशाला वाचविणारे नेतृत्व नरेंद्र मोदीच,अजून कुणाच्या हि मनगटात देश सांभाळण्याची ताकद निर्माण...

देशाला वाचविणारे नेतृत्व नरेंद्र मोदीच,अजून कुणाच्या हि मनगटात देश सांभाळण्याची ताकद निर्माण झालेली नाही – स्नेहलता कोल्हे

भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्या विरोधात काही विरोधकांनी व पात्रता नसलेल्या बालिश फुलीश बडबडीला जनतेने स्पष्टपणे नाकारून त्यांच्या उमेदवारांच्या अनामत रकमाहि जप्त केल्या हा मोदी व योगी नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने आनंदत्सव आहे.—-स्नेहलता कोल्हे,भाजप प्रदेश सचिव

संपादक – राजेंद्र तासकर
भारतीय जनता पक्ष आणि देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकल्यामुळेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड,मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपने पुन्हा सत्तेचे कमळ राखले आहे,हि २०२४च्या लोकसभेच्या विजयाची नांदी आहे.देशाला वाचविणारे नेतृत्व नरेंद्र मोदी हेच आहे.अजून कुणाच्या हि मनगटात देश सांभाळण्याची ताकद निर्माण झालेली नाही आणि होणार हि नाहीअसे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
विजयाचा आनंदोत्सव सौ.कोल्हे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करत शहरातील मुख्य रस्त्यावर आम जनतेला डोलीबाजाच्या जल्लोषात लाडू आणि पेढ्यांचे वाटप केले.फटाके आणि गुलालांची मुक्त उधळण यावेळी करण्यात आली.
कोपरगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने पक्ष कार्यालयात चार राज्यातील निवडणुकीचा जल्लोष साजरा करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.प्रारंभी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविक केले.प्रदेश भाजपचे रवींद्र बोरावके म्हणाले कि,भाजप आणि देशाचे नेतृत्व मोदी यांच्या विषयी विरोधी पक्ष बाष्कळ बडबड करत होते त्यांना चार राज्यातील निवडणुकीत मोदींचा करिष्मा पाहायला मिळाला आता त्यांची बोलती बंद होणार आहे. महाराष्ट्रात तीन पायाचे सरकार सांभाळताना कसरत करावी लागत आहे पण २०२४ ची विधानसभा हि भाजप मोठ्या नेतृत्वाने विजयी होईल यात कुठलाही संदेह नाही.
सौ.स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या कि,उत्तर प्रदेश, उत्तराखंड,मणिपूर आणि गोवा या चार राज्यातील मतदारांनी भाजपला दिलेल्या कौल हा देशवासीयांसाठी दिलेला आहे.राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपला मोठी परंपरा आहे.येथे भरवश्याचे नेतृत्व आहे.कॉंग्रेस पक्षात ते दिसत नसल्याने त्यांची आज वाताहत झाली आहे.गोवा राज्याचे प्रभारी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा सोपान राखून पंतप्रधान मोदींसह सर्व राष्ट्रीय नेतृत्वाचा विश्वास अधिक दृढ केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास व सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणीमुळे चार राज्य भाजपने पुन्हा काबीज केले आहे. जनेतेच्या विश्वासाला भाजप आगामी काळात हि पात्र ठरेल असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी शहराध्यक्ष दत्ता काले,अविनाश पाठक,स्वप्नील निखाडे,मंगल आढाव,विजय आढाव,राहुल सूर्यवंशी,कैलास खैरे,जगदीश मोरे,हर्षदा कांबळे,विद्याा सोनवणे,राजेंद्र सोनवणे,नरेंद्र डंबीर,शिल्पा रोहमारे,वैभव गिरमे,कानिफ गुंजाळ,दीपक जपे,रिपाईचे दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुशांत खैरे यांनी सूत्रसंचालन केले.

    

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!