Homeकोपरगावगावचा इतिहास नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतो -डॉ दादासाहेब गलांडे

गावचा इतिहास नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतो -डॉ दादासाहेब गलांडे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव – प्रत्येक नावाला,गावाला मोठी सांस्कृतिक,ऐतिहासिक भौगोलिक परंपरा लाभलेली असते काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतरे घडतात,बदल घडून येतात.जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इतिहास लेखन संवर्धन जतन करणे गरजेचे आहे,असे विचार कोपरगाव येथील जेष्ठ साहित्यिक डॉ.दादासाहेब गलांडे यांनी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने व्यक्त केले.

मुळचे सिन्नर तालुक्यातील वावी येथील लेखक डॉ.दादासाहेब गलांडे यांनी आजतागायत अनेक कथा, कविता संग्रह प्रकाशित केले आहेत. वावी येथील ग्रामपालिका,वसुंधरा प्रकाशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुन सदाशिव वेलजाळी यांनी,”ऐतिहासिक वारसा असलेलं गांव: वावी” या चरित्र ग्रंथाचे लेखन व संपादन केले आहे.सदर चरित्र ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.

अध्यक्षस्थानी सरपंच विजय काटे, प्रमुख पाहुणे म्हणून रमेश पडवळ,सौ. निलिमा क्षत्रीय,अशोक दुधारे,प्रशांत पाटील,तुकाराम ढिकले आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य कारभारी वेलजाळी,नुतन विदयालयाचे अध्यक्ष रामनाथशेठ कर्पे,माजी सरपंच विठ्ठलराव राजेभोसले,आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी पुस्तक प्रकाशन संयोजन समितीचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव वावी या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनामुळे नव्या पिढीला जुनी माहिती उपलब्ध झाल्यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!