
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कोपरगांव येथे ब्राह्यण सभा कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगांव शहरातील सर्वासाठी सर्व रोग निदान शिबीर रविवार दि.२५ फेब्रुवारी२०र४ रोजी ब्राह्यण सभा मंगल कार्यालय,श्रीराम नगर कोपरगांव येथे सकाळी ठिक. ९.०० वा. ते दुपारी १वा.पर्यत आयोजित करण्यात येणार आहे अशी माहीती एस.जे. एस.हाॕस्पीटलचे कार्यकारी संचालक श्री.प्रसाद चांगदेव कातकडे आणि ब्राह्यण सभेचे सचिव श्री.सचिन देविदास महाजन यांनी दिली आहे.
या शिबिरांमध्ये बी.पी,शुगर,२ डी ई को,ईसीजी इ.तपासणी करण्यात येणार असुन गरजुना मोफत औषधे वितरीत केली जाणार आहे.या शिबिरात अनुभवी तज्ञ डाॕक्टर प्राचार्य यांचे मार्गदर्शन व सल्ला आणि आवश्यकता भासल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्राह्मण सभा, कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हाॕस्पीटल यांच्या वतीने करण्यात आले आहे.