Homeकोपरगावछत्रपती शिवाजी महाराजांची सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रण करण्याची गरज आजच्या काळात खुप...

छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रण करण्याची गरज आजच्या काळात खुप गरजेची आहे – सुरज तुवर सर

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदुस्तानात नव्हे तर संपूर्ण जगात एक आदर्श राजा,जनतेचे कैवारी होते असे प्रतिपादन कोपरगांव तालुक्यातील महान शिव व्याख्याते सूरजजी तूवर सर यांनी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली तेव्हा ते बोलत होते .

आज आपण डी.जे च्या तालावर ठेका धरून आपल्या या महान राजाची जयंती साजरी करतो हे कितपत योग्य आहे,केवळ 19 फेब्रुवारीला फक्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे अपेक्षित नाही तर महाराज कसे वागले,सर्व तळागाळातील लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य कसे निर्माण केले हे पाहणे आवश्यक आहे.जाती,धर्म,पंथ हा रोग आज संपूर्ण भारतात लागला आहे त्यामुळे परकीय शक्ती आज घुसखोरी करत आहे.आजची जिजामाता तोंडाला मेकअप करून,भारी बाईक वर स्वार होऊन मोबाईल फोन घेऊन वावरते हे योग्य आहे का?असे अनेक चांगले/वाईट प्रसंग सांगुन सुरज तुवर सर यांनी शाळेतील सर्व विद्यार्थि आणि शिक्षक वृंद यांना आपल्या भाषण शैलीतून उद्बोधन केले.जवळ जवळ एक तास त्यांनी महाराजांचा इतिहास आणि वास्तव समोर मांडला होता.

या प्रसंगी उपस्थित शाळेचे प्राचार्य मोहसिन शेख सरांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेक भैय्या कोल्हे मॅडम यांनी केले.या प्रसंगी शाळेचे के.जी पासून दहावी पर्यंत चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या विद्यार्थ्यांनीनी केले तसेच अफजलखान वध नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली ते प्रायमरीचे चिमुकले शाळेच्या शिक्षिका सौ.सूर्यवंशी मॅडम यांनी नियोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक अनुप गिरमे,सचिन पाटसकर,शेख मॅडम,विशाल परजने,स्मिता दरेकर,उगले,बहिरट,बोळिज,उमेश परजणे. शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!