Homeकोपरगावजागतिक महिला दिनानिमित्त आशा स्वयंसेविकांनी अवयव दानाचा केला संकल्प ; त्यांचे सर्वच...

जागतिक महिला दिनानिमित्त आशा स्वयंसेविकांनी अवयव दानाचा केला संकल्प ; त्यांचे सर्वच स्तरातून होत आहे कौतुक

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव : – जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी अवयव दान फॉर्म भरुन देवून एक वेगळ्या पद्धतीने संकल्प करून महिलादिन केला साजरा,डॉ.अशोक गावित्रे हे अनेक वर्षापासून अवयव दान प्रचार व प्रसार करत असून ते मोहन फाउंडेशन तसेच फेडरेशन ऑफ बॉडी अण्ड ऑर्गन डोनेशन व महाराष्ट्र शासन माध्यमातून अवयव दान विषयी प्रबोधन करत आहे,जागतिल महिला दिनानिमित्त त्यांनी आज कोपरगांव तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना अवयव दान विषयी शपथ दिली तसेच त्यांचे फॉर्म देखील भरून त्यांना या अवयव दान कार्यात सक्रिय होण्यासाठी प्रबोधन देखील केले.

आज अवयव दान ही राज्याची च नव्हे तर संपूर्ण देशाची गरज असुन, देशात पाच लक्ष मृत्यु हे दरवर्षी अवयव न मिळाल्यामुळे होतात.आजही अवयव दान विषयी शाश्वत माहीती नसल्याने व गैरसमज असल्याने अवयव दान होताना दिसत नाही.आज प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे काम या आशा स्वयंसेविका करत असून त्यांचा हा धाडसी निर्णय निश्चितच कोतुकास्पद आहे.महिला या अवयव दान कार्यात देखील मागे नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.

या कार्यासाठी त्यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप तसेच सौ.नीलम कानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!