
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या कोपरगाव तालुका कार्याध्यक्षपदी तालुक्यातील श्री.प्रदीप लोखंडे यांची,आत्तापर्यंत निस्वार्थपणे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवुन जिल्हाध्यक्ष श्री.अनिल दिनकरराव ताके यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे. त्यांच्या यानिवडीबद्दल ग्रामस्थांच्यावतीने शाल,श्रीफल व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना श्री.लोखंडे म्हणाले की,वरिष्ठांनी माझी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाच्या कार्याध्यक्षपदी एक वर्षासाठी निवड करून माझ्यावर दिलेली जबाबदारी मी जनहितासाठी लोकशाही मार्गाने सामाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द राहील.
यावेळी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मा.ज्ञानेश्वर बापु परजणे,संजीवनी सहकारी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन मा.राजेंद्र परजणे,भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष मा.मुकुंद मामा काळे,संवत्सर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मा.महेश परजणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर तालुक्यासह पंचक्रोशीतुन सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव होत.