

संपादक – राजेंद्र तासकर
प्रहार संस्थापक अध्यक्ष मा.ना.ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली
अपंगांचे हक्क व अधिनियम कायदा १९९५अंतर्गत येणाऱ्या सोयीसुविधा महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीसाठी शासनाने परिपत्रकांन्वये प्रसिध्द केलेले असतांना सुद्धा त्या-त्या ठिकाणचा संबंधीत घटक लाभापासून आजपर्यंत वंचित का ? असा प्रश्न प्रहार दिव्यांग क्रांती संघटना,कोपरगाव येथील दिव्यांगांना पडला आहे.आणि म्हणूनच आज कोपरंगाव नगरपरिषद येथील मुख्याधिकारी मा.श्री.शांताराम गोसावी साहेब यांना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले कि, नगरपालिकेच्या स्व-उत्पनातुन ५% निधी दिव्यांग लाभार्थ्यांना मिळावा,नगरपालिका हद्दीतील दिव्यांगांचा आद्याप घरकुलामध्ये समावेश झालेला नसून त्यांना लवकरात लवकर समाविष्ट करुन लाभ देण्यात यावा,त्याचबरोबर उदरनिर्वाहाच्या दृष्टीने नगरपालिका हद्दीत खोका शॉपसाठी जागा उपलब्ध करून व्यवसायासाठी परवानगी देण्यात यावी,शासनाच्या ध्येय धोरणानुसार नळपट्टी व पाणीपट्टीमध्ये ५०% सवलत मिळावी आणि ज्या दिव्यांगांना बाराही महिने औषधोपचाराची गरज असते त्यांना शहर ऋग्णालयात मोफत औषधोपचाराची पूर्तता करण्यात यावी हे व असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यास दिव्यांगांना मदत करावी.वरील प्रश्नांबाबत मा. मुख्याधिकारी श्री.शातांराम गोसावी साहेब यांनी सविस्तर चर्चा करून सर्व विषय सोडविण्यासाठी प्रशासन सकारत्मक आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती सघटंना कोपरगाव सल्लागार ॲड.श्री.योगेशभाऊ खालकर साहेब,जिल्हा सघटंक श्री. परमेश्वर कराळे सर,सदिंप शिरसागर प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष,कोपरंगाव शहराध्यक्ष प्रविण सुदाम भुजाडे, तालुकाध्यक्ष शरद खिलारी,शहर सचिव संदिप कवडे,प्रशांत चिमंणपूरे,जनार्दन पवार, विनोद नरोडे,महेश रावल आदि दिव्यांग बाधंव बहूसंख्येने उपस्थित होते.