Homeकोपरगावसाईधाम मंदिराचा पंचविसावा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन

साईधाम मंदिराचा पंचविसावा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव :- कोपरगाव येथील साईभक्त,वाचस्पती धोंडीरामबाबा चव्हाण यांच्या प्रेरणेने स्थापनझालेल्या शहरालगत असलेल्या नगर मनमाड महामार्गावरील अंबिका धोंडीबानगर येथील साईधाम मंदिराचा पंचविसावा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सालाबाद प्रमाणे याही वर्षी १६ जुन रोजी साजरा होत असुन त्यानिमीत्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई करून फुलांची भव्यदिव्य सजावट केली जात आहे.

महाराष्ट्रासह देश विदेशातील असंख्य साईभक्त धोंडीबाबा चव्हाण यांचे शिष्य असुन अंबिकानगर साईधाम परिसरात स्व.धोंडीबाबा चव्हाण यांनी स्वतःपरिश्रम घेत भव्यदिव्य अशी साई मंदिराची उभारणी केली असून तेथे येणाऱ्या भक्तजनांची मनोकामना पूर्ण होते.सदर ठिकाणी वृक्ष,ध्यानसाधना केंद्र,अन्नछत्र आदिची उभारणीमुळे नयनरम्य धार्मीक वातावरणाच्या निर्मितींने साईभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परमशिष्य व मठाधिपती रमेशगिरी महाराज, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे,आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुप्रसिध्द ड्रमवादक पदमश्री पुरस्कार प्राप्तकर्ते शीवमणी, साईभक्त सुमीत पोंडा,गझल गायक राजेश कुमार,दिल्लीचे नागर बंधु, चंदीगढच्या सोनाक्षी महंत, सिमरन महंत,नवीदिल्लीचे लाईव्ह पेटींग आर्टिस्ट साईरतन राजेश आदि साईभक्त गेल्या २४ वर्षापासुन धोंडीबाबा साईचरणी भजनसेवेसह अन्य धार्मिक सेवा देत आहेत.

तसेच शिर्डी पंचक्रोशीतील साईभक्त नित्यनेमाने येथे दर्शनासाठी येतात. यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने साईमंदिरावर विद्युत रोषणाई सह फुलांची सजावट करण्यांत आली आहे.

साईभक्त धोंडीबाबा चव्हाण हे वाचस्पती होते त्यांनी असंख्य भक्तांच्या इच्छा पुर्ण करून ज्या ज्या साईभक्तांना स्व: वाणीतुन बोध देत असंख्य समस्यांचे निराकरणावर सांगितलेल्या सर्व उपाययोजना ख-या ठरल्यांने देश विदेशात त्यांचा मोठा शिष्यपरिवार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!