Homeकोपरगावसहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पर्यावरण सप्ताह साजरा

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पर्यावरण सप्ताह साजरा

*****************************************************

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पर्यावरण सप्ताह साजरा करण्यांत आला त्यात कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

*****************************************************

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव :-दिवसेंदिवस वाढणारे तपमान,पर्यावरणांवर त्याचे विपरीत होणारे परिणाम आणि वातावरणांतील उष्णता कमी करण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यांत आला.

कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांच्या हस्ते पर्यावरण सप्ताहानिमीत्त संजीवनी सेंद्रिय खत विभागात वृक्षारोपण करून त्याच्या संवर्धनावर विशेष भर दिला जात आहे.ते म्हणाले की,सातत्यांने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे हवामानावर होणारे विपरीत परिणाम आणि पर्यावरणातील बदलामुळे पर्जन्यमान कमी कमी होत चालले त्याच्या गंभीर दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे तेंव्हा प्रयेकाने वृक्ष लागवडीवर भर देवुन असे पर्यावरण सप्ताह काळाची गरज म्हणून साजरे करावे असे सुतार शेवटी म्हणाले.

प्रारंभी उसविकास अधिकारी शिवाजीराव देवकर यानी प्रास्तविकांत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे सातत्यांने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणावर भर देतात असे सांगुन त्यांनी आजवर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देवुन कारखान्याच्या नर्सरी विभागात विविध रोपे तयार करून ते विविध प्रशासकीय कार्यालये,सार्वजनिक आरोग्य केंद्रे, शहर विभागातील प्रभाग सार्वजनिक ठिकाणे,अंगणवाडया,ग्रामपंचायत, सहकारी सोसायटया आदि ठिकाणी वृक्षारोपणासाठी पुरविले असल्याचे सांगितले.

याप्रसंगी रासायनिक विभागाचे टी.व्ही.देवकर,आसवनी विभाग प्रमुख आर.जे.जंगले,सल्लागार योगेश पवार आदि उपस्थित होते.

शेवटी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आभार मानले.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!