Homeकोपरगावआंतराष्ट्रीय योगदिनानिमित्त डि पॉल पब्लिक स्कूलमध्ये योग दिन साजरा

आंतराष्ट्रीय योगदिनानिमित्त डि पॉल पब्लिक स्कूलमध्ये योग दिन साजरा

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २१जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषीत केलेपासुन दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन २१जूनला साजरा करण्यात येतो,

डि पॉल पब्लिक स्कूल,कोपरगाव शहरातील साई सिटी परिसरातील नव्याने सुरू केलेल्या व C.B.S.E चे शिक्षण देणाऱ्या डि पॉल पब्लिक स्कूलमध्ये योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्राचार्य फादर जॉमी जोसेफ, उपप्राचार्य पृथ्वीपाल,योग प्रशिक्षिका रेखा वर्मा यांसह आदि शिक्षक – शिक्षिका, विद्यार्थी -विद्यार्थीनी योगसाधनेत तल्लीन झाले होते.

यावेळी प्रिन्सिपल यांनी विद्यार्थ्यांना योग साधना आणि त्या दिवसाचे महत्त्व याबद्दल माहिती सांगितली तसेच उपप्राचार्य पृथ्वीपाल सर यांनी मुलांना योग अभ्यासामुळे आपण कशा प्रकारे तंदुरुस्त जीवन जगू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांनी रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योग साधना करावी असे आवर्जून सांगितले.

यावेळी योग प्रशिक्षिका रेखा वर्मा यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे योगाचे प्रशिक्षण देऊन योगा करून घेतली सर्वांनी मोठ्या आनंदात व उत्साहात योगा करत योगदिन साजरा केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!