Homeकोपरगावकोपरगांव आगाराचे वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे बसमध्ये विसरलेला महागडा मोबाईल प्रवाशाला मिळाला परत

कोपरगांव आगाराचे वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे बसमध्ये विसरलेला महागडा मोबाईल प्रवाशाला मिळाला परत

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव :- आपल्याजवळील हरवलेल्या वस्तुची प्रत्येकालाच चुटपूट लागत असते.प्रामाणिक अप्रामाणिक पणावर नेहमीच चर्चा होते पण कोपरगांव आगारातील वाहक ए.पी. माळी हे त्याला अपवाद आहेत, प्रवासात बसमध्ये विसरलेला महागडा मोबाईल त्यांनी प्रवाशाला परत करत कर्तव्यात चोख असल्याचे दर्शन घडले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कोपरगांव आगारातील वाहक ए.पी. माळी आणि चालक श्री.शेख हे बुधवारी बस क्रमांक एम.एच.०७- ९१२१ मुक्कामी सत्यगांवी घेवुन गेले.गुरूवारी (२७ जून) रोजी ही बस परत कोपरगांवी आगारात आली.सत्यगांवहुन कोपरगांवी आलेले बस मधील सर्व प्रवासी उतरलेही त्या गडबडीत एका महिला प्रवाशाचा महागडा मोबाईल बसमध्ये विसरला.
कोपरगावी उतरलेल्या प्रवाशी महिलेल्या मोबाईल विसरल्याचे लक्षात येईपर्यंत बसचा पुन्हा गोधेगांवच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता.सदर महिलेने आगारप्रमुख यांचेकडे चौकशी करत,आगार प्रमुखाच्या मोबाईलवरून वाहक ए.पी.माळी यांच्या मोबाईलवर कॉल केला.बस तोपर्यंत साईबाबा कॉर्नरपर्यंत गेली होती. वाहक माळी यांनी वेळेचा विचार न करता बस आहे तेथेच थांबविली.सदर महिला एका मोटारसायकलस्वाराच्या सहाय्याने साईबाबा कॉर्नरपर्यंत आली व वाहक ए.पी.माळी यांनी त्या महिलेला तिचा महागडा मोबाईल परत केला. त्यावर त्या महिलेने वाहकाचे आभार मानले आणि ती निघुन गेली.

त्यावर वाहक ए.पी.माळी यांच्या तोडुन निघालेले शब्द “कष्टाचे पुरत नाही तर असे फुकटचे घेवुन करायचे काय ” वाहक माळी यांच्या या प्रामाणिकपणाचा सर्वत्र लौकिक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!