
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – आजचे विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे नेतृत्व करणार असतात आणि त्यांना त्याची जाणीव ही विद्यार्थी असे पासूनच व्हायला हवी या उद्देशाने डिपॉल पब्लिक स्कूल साई सिटी कोपरगाव या ठिकाणी प्राचार्य फादर जॉमी जोसेफ व उपप्राचार्य पृथ्वीपाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्कुल अंतर्गत विद्यार्थ्यांची मागील आठवड्यात 2024/ 25 वर्षाकरिता निवडणूक घेण्यात आली.
सदर निवडणुकीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक मते मिळाली त्या विद्यार्थ्यांचा आज दि.16 जुलै 2024 रोजी शाळेमध्ये मोठ्या थाटामाटात शपथ विधी समारंभ पार पडला.
यावेळी शाळेचे प्राचार्य फादर जॉमिंग जोसेफ यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली तसेच शपथ ग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात कोणकोणती जबाबदारी सांभाळायची व काय काम करावयाचे आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहीती दिली.
यावेळी बोलतांना फादरने सांगितले की,आजचे सक्षम विद्यार्थीच उद्या देशाचे सक्षम नेतृत्व करू शकतात,आणि नेतृत्व हे कुणावर अधिकार गाजण्यासाठी नाही तर लोकांना योग्य दिशा देण्यासाठी असते असेही फादर स्वामी जोसेफ यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
तसेच 2024/25 या शैक्षणिक वर्षाकरिता कृष्णा दिनेश आहेर याची हेड बॉय व सलोनी सुनील लासलकर हिची हेड गर्ल म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्याचबरोबर राजवीर शंकरलाल कुमावत याची स्पोर्ट कॅप्टन तर कस्तुरी रवींद्र गायधने हिची व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
वरील सर्व शालेय मंत्रीमंडळाचे शाळेचे प्राचार्य,उपप्राचार्य,शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.