
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांचा जन्मदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

यामध्ये शाळेतील के.जी पासुन दहावी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सबंधित वर्ग शिक्षक,शिक्षिका यांच्या सकार्याने प्रत्येक वर्गात आकर्षक डेकोरेशन करुन सजावट केली होती.. त्याचबरोबर संपूर्ण वर्गात केक कापून तसेच शुभेच्छा कार्ड देऊन रेणुका मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रम शाळेच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता यावेळी शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख सर यांनी रेणुकाताई यांना आपल्या भाषणातून खुप उद्बोधक शुभेच्छा दिल्या.शिक्षक वृंद कैलास बहिरट सर, दिपक बोळिज सर,अनुप गिरमे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत रेणुकाताई यांना शुभेच्छा दिल्या.

इयत्ता नववीतील विद्यार्थीनीनी स्वागत गीत आणि शुभेच्छा गीत सादर करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.इयत्ता दहावीच्या वर्गातील कुमारी. आदिती वल्टे व रविना जोधा या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य मोहसीन शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनींनी केले अथक परिश्रम घेतले.