
निशांत घरत याची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )जेएनपीटीच्या कर्मचारी मनीषा जाधव यांचे निलंबन करून त्यांच्या कागदपत्रांचे उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार उपोषणकर्ते निशांत घरत यांनी केला आहे. आज दि 24/3/2022 रोजी उपोषणाचा 4 था दिवस आहे.दिनांक 21/3/2022 रोजी हे उपोषण सुरु झाल्याने निशांत घरत यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र प्रशासनाने अजूनही या उपोषणाची दखल न घेतल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त केले जात आहे.
मनीषा जाधव यांचे निलंबन करणे,शासनाच्या नियमानुसार नवीन शेवा गावासाठी 33 हेक्टर जागेचे वाटप आणि वाढलेल्या कुटुंबांसाठी वाढीव गावठाण साठी शासनाच्या नियमानुसार जागा सुपूर्द करणे,सेझ आणि नवीन येणाऱ्या प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमीपुत्र यांना प्राधान्याने नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. प्रथम प्राधान्य ज्याच्या जमिनीवर प्रकल्प उभा आहे त्यांना, द्वितीय प्राधान्य त्या गावातील लोकांना, तृतीय प्राधान्य उरण तालुक्यातील तरुणांना मिळाली पाहिजे या मागण्यासाठी निशांत घरत यांचे उपोषण सुरु आहे.मागण्या मान्य झाल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार निशांत घरत यांनी केला आहे.यावेळी उपोषण स्थळी नवीन शेवा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.