Homeकोपरगावसंजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल चे पुन्हा एकदा नेत्रदीपक सुयश

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल चे पुन्हा एकदा नेत्रदीपक सुयश

कोपरगांव :- सर्व सामान्य नागरिकांच्या पाल्यास इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे ही दुरदृष्टी असलेले दिवंगत माजी सहकारमंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांनी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल ची सुरुवात केली. या शाळेने अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले. दरवर्षी प्रमाणे या शाळेने इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा नेत्रदीपक सुयश मिळविले आहे.

आज पर्यंत या शाळेने इयत्ता दहावीचा निकाल कायम १००% ठेवण्यात विशेष परिश्रम घेतले आहे. या वर्षी जाहीर झालेल्या निकालात पुन्हा सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कृष्णा परजणे हा विद्यार्थी 93% गुण मिळवून शाळेत प्रथम आला आहे. त्याच प्रमाणे शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी भरपूर गुण मिळवून उत्तुंग यश मिळवले आहे. शाळेच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संजीवनी उद्योग समुह अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब, प्रथम महीला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, आमदार विवेकभैय्या कोल्हे साहेब, शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

शाळेत या शैक्षणिक वर्षात नवीन ॲडमिशन सुरू असून पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्याध्यापक मोहसिन शेख सर यांनी सांगितले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

यावर्षी शाळेचे 62 विद्यार्थी एस. एस. सी. परीक्षेसाठी प्रविष्ट होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 90% पुढे 3 विद्यार्थी, 80% पुढे 14 विद्यार्थी, 70% पुढे 18 विद्यार्थी, 60% पुढे 17 विद्यार्थी, 50% पुढे 10 विद्यार्थी आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!