

उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )आगरी कोंढरी पाडयातील शेतकरी ग्रामस्थांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात KTPL कपंनीच्या विरोधात आगरी कोंढरी पाड्यातील बाधित ग्रामस्थ शेतकरी व मच्छीमारांतर्फे करंजा टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड(KTPL )कंपनीच्या गेट समोर दि 24/3/2022 रोजी सकाळी 9 वा. गेट बंद आंदोलन करण्यात आले.यावेळी KTPL कंपनी प्रशासनाने उपस्थित ग्रामस्थांना पुढील चर्चा करण्यासाठी 12 एप्रिल 2022 रोजी बोलविल्याने आगरी कोंढरी ग्रामस्थांतर्फे सुरु असलेला गेट बंद आंदोलन 12 एप्रिल 2022 पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
उरण तालुक्यातील करंजा येथील आगरी कोंढरी पाड्यातील शेतकरी ग्रामस्थांच्या जमिनीचा वापर करून करंजा टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड (KTPL )ही कंपनी उभारण्यात आली. आगरी कोंढरी ग्रामस्थ मंडळ व KTPL कंपनी यांच्यात 9 फेब्रुवारी 2015 रोजी झालेल्या करारातील एकाही अटीची पूर्तता अद्यापही झाली नाही. ज्याच्यामुळे भरपूर प्रमाणात सुशिक्षित वर्ग बेरोजगारीकडे वळला आहे. आणि त्यामुळे गावकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. तसेच KTPL कंपनीने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत स्थानिक नागरिकांवर शेतकरी, मच्छिमारांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. अशा प्रकारे बाधित शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या मागण्या कंपनी व सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी KTPL कंपनी विरुद्ध गेट बंद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल KTPL कंपनी प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने घेतली आहे.कपंनीचे अधिकारी रंगनाथ गरुड आणि पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी आंदोलन कर्त्यांना शांततेचे आवाहन केले होते. चर्चेअंती विविध मागण्या संदर्भात कंपनी व ग्रामस्थ, आंदोलनकर्ते यांच्यात 12/4/2022 रोजी संयुक्त बैठक घेण्याचे ठरले.त्यानुसार सुरु

असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
12 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे मुख्य संचालक जय मेहता व आगरी कोंढरी पाडा ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक असून 9 फेब्रुवारी 2015 रोजी झालेल्या करारातील पंधरा मागण्यांवर योग्य ती चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. मागण्या मान्य न झाल्यास पुढचा आंदोलन हा आमरण उपोषणाचा असेल अशी माहिती गाव कमिटीचे अध्यक्ष करण भोईर यांनी दिली.
यावेळी KTPL कंपनीचे अधिकारी रंगनाथ गरुड, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, गाव कमिटीचे अध्यक्ष करण भोईर,सेक्रेटरी कृष्णा पाटील, ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश म्हात्रे तसेच गावातील वरिष्ठ ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.