
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल व आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने तसेच सी बीएसई विभागाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतातील सीबीएसई शाळांच्या विद्यार्थीसाठी राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा दि.15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2024 दरम्यान होणार असून,या स्पर्धेचे उद्घाटन दि.15 आक्टोबर 2O24 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. तसेच, सदर कार्यक्रमाचा समारोप दि.19 आक्टोबर 2O24 रोजी दुपारी 12:3O वाजता सप्तपदी मंगल कार्यालय शिर्डी येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी. उपजिल्हाधिकारी मान. नंदकुमार सुर्यवंशी साहेब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे ते म्हणाले कि,या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल व आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलच्या सहकार्याने करण्यात आले आहे.या स्पर्धेत 11,14 आणि 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग असेल.या स्पर्धेत भारतातून सीबीएसईच्या 16 विभागातून 2,000 ते 2,500 विद्यार्थी सहभागी होणार आहे. सीबीएस ईच्या वतीने स्पर्धा निरीक्षक म्हणून डॉ.मेघा साहू या काम बघणार आहे.
या स्पर्धेत आठ जिम्नॅस्टिक प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांची कौशल्ये पारखली जाणार आहेत.प्रत्येक गटातील प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना भरघोस बक्षिसे प्रदान करण्यात येतील असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.
यात सहभागी विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था शिर्डी संस्थांच्या साईधाम आश्रम येथे करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यiनी आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल,आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल – 8669600700 किंवा atmamalikeducational@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.