Homeकोपरगावप्रा.पंडीत भारूड यांच्या लेखनांत ग्रामिण आशय सौंदर्याचा वास- दिग्दर्शक अनिल साळवे

प्रा.पंडीत भारूड यांच्या लेखनांत ग्रामिण आशय सौंदर्याचा वास- दिग्दर्शक अनिल साळवे

कलावंत विचारमंच व कमान फिल्म प्रॉडक्शन व कमल उद्योग समुह नाशिक यांच्यावतीने साहित्यीक प्रा. पंडीत भारूड यांना ग्लोबल आडगांव चित्रपटाचे दिग्दर्शक प्रा.डॉ.अनिल साळवे, स्वागताध्यक्ष सुनिल मोंढे,प्रा डॉ दिपाली सोसे,प्रा सोमनाथ मुठाळ, नाटय अभिनेते सतिष खरातआदिंच्या हस्ते राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार प्रदान करण्यांत आला.

******************************************************

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव : – गंडेतोडे लेखनकार प्रा. पंडीत भारूड यांच्या लेखनांत ग्रामिण आशय सौंदर्याचा वास असुन त्यांच्या साहित्यातुन आगामी पिढीला मार्गदर्शन मिळते असे प्रतिपादन ग्लोबल आडगांव चित्रपटाचे दिग्दर्शक प्रा.डॉ.अनिल साळवे यांनी केले.

तालुक्यातील संवत्सर भीमवाडी परिसरातील ग्रामिण साहित्यीक व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे कर्मचारी व कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे संचालक प्रा.पंडीत भारूड यांच्या लेखन साहित्यास कलावंत विचारमंच व कमान फिल्म प्रॉडक्शन व कमल उद्योग समुह नाशिक यांच्या वतींने नुकताच राज्यस्तरीय कमल ट्रॉफी,प्रशस्तीपत्र देवुन पुरस्कार प्रदान करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी कलावंत विचारमंचचे स्वागताध्यक्ष सुनिल मोंढे यांनी प्रास्तविक केले.प्रा.डॉ.अनिल साळवे पुढे म्हणाले की,ग्रामिण भागातील साहित्यीक अजुनही उपेक्षीत आहे. त्यांच्याकडे पुरेशी साधने उपलब्ध नसतांनाही ते आपल्या लेखनीचा प्रभाव साहित्यात उतरवित असतात.,अशा साहित्यीकांचा शोध घेवुन त्यांचा योग्य सन्मान करणे हे क्रमप्राप्त असल्याने कलावंत विचारमंच त्यासाठी नेहमीच धडपड करत आहे.प्रा. पंडीत भारूड यांनी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीत उतरवुन आपल्या लेखनींत ते साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी गंडेतोडे, लाव्हा, क्रांतीसुर्या,पीसीबी या पुस्तकासह सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या जीवन कार्यावर विजयीगान चित्रफित तयार करत त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण तेवत ठेवली आहे.यासह त्यांनी मराठी चित्रपट फळा,मराठी गीताचे ध्वनीमुद्रण करत साहित्य कला जोपासली आहे.

सत्कारास उत्तर देतांना प्रा.पंडीत भारूड म्हणाले की,घरची परिस्थिती जेमतेम असतांनाही शिक्षणातुन समृध्द होत आयूष्यातील एकेक शिखरे पादाक्रांत केली त्याचाच हा पुरस्कार असुन तो आजवरच्या प्रवासात साथ देणा-या ज्ञात अज्ञात घटकांना समर्पीत करीत आहे.

याप्रसंगी प्रा.डॉ.दिपाली सोसे,प्रा.सोमनाथ मुठाळ,नाटय अभिनेते सतिष खरात,आदि साहित्यीक उपस्थित होते.कार्यक्रमाचेसुत्रसंचलन किर्तन चंद्रिका वैजयंती,बाळासाहेब गिरी यांनी केले तर प्रा.सुप्रिया गवळी यांनी आभार मानले.या पुरस्कारा बददल प्रा.पंडीत भारूड यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे,कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे,सचिव सुमितदादा कोल्हे,कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, आदिंनी अभिनंदन केले आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!