
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाचे उप.मुख्याध्यापक श्री रघुनाथ लकारे व पर्यवेक्षक श्री.अनिल अमृतकर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जेष्ठ शिक्षक श्री.दिलीप कुडके,श्री.एस.सी.बर्डे ,सौ.कल्पना महानुभाव,सौ. राजश्री बोरावके उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री.कैलास ठोळे, सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव श्री. सचिन अजमेरे,कार्यकारिणी सदस्य श्री संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,दीलीप तुपसैंदर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अंजली गायकवाड यांनी केले तर आभार श्री पंकज जगताप सर यांनी मानले.