
पहिले सरकारी जमीनीवरील प्रस्थापित नेत्यांची अतिक्रमण निष्कासित करावीत व नंतरच जनता दरबाराच आयोजन करावे.
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :- ठराविक कालावधीत कोपरगांव सरकारी कचेरी मध्ये आमदार यांनी जनता दरबार घेऊन लोकशाहीच्या दुसरा खांब हा किती दुबळा, भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे याची जाणीव करून देणे व आमचे वैयक्तिक शासकीय कामे नियमित करून द्यावीत, असा संदेश देण्यासाठीच आहे. वास्तविक पाहता शासकीय गावठाण जमीनीवरील महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट चे बांधकाम निष्कासित करणे साठी

महसूल विभागाने नगरपालिका यांना लेखी आदेश दिले असताना, नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिक्रमण पाडणे अथवा निष्कासित करणेकामी जबाबदारी पार पाडली नसल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश क्रॉग्रेस कमिटी सचिव नितिन मनोहर शिंदे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिद्धीपत्रकात श्री. शिंदे पुढे म्हणाले की,मात्र सर्व सामान्य जनतेचे नुकतेच अतिक्रमण काढते वेळी कुठली ही माणुसकी दाखवली नाही. गरीब सामान्य जनतेला श्रीमंतांच्या अतिक्रमणाबाबत बोलायची हिमंत नाही, तर श्रीमंत नागरीकांना बोलायला त्या बाबतीत वेळ नाही. ह्याचा गैरफायदा लोकशाहीतील दोन खांब जनतेतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी नुकताच घेतला आहे.
तिसरा व चौथ्या खांब म्हणजे न्यायालय व पत्रकार हे हल्ली खूप खर्चिक झाल्यामुळे सर्व सामान्य माणसाला लोकशाहीच्या ही व्यवस्था काय फक्त धनिकांसाठी असल्यासारखी असावी असा समज ह्या अतिक्रमण मोहीम निमित्ताने पक्का झाला आसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोपरगांव शहर व तालुक्यातील ह्या सरकारी व राजकीय व्यवस्थापनाला जनता पुर्ण पणे वैतागलेली आहे.अशा स्थितीत कधी हि मोठा उठाव होऊ शकतो. वातावरणाला निवळायला व शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना सर्व जनतेचा किती त्रस्त आहे, शासकीय यंत्रणेवर किती रोष आहे हे प्रात्यक्षिक रित्या दाखवायचे यासाठी असे जनता दरबार भरवले जातात व मीच तुम्हाला यातून वाचवू शकतो तेव्हा मी निर्देश करील तसेच कामे करा असा ह्या दरबारातून एक प्रकारे संदेशच दिला जातो. असाही आरोप श्री. नितिन शिंदे यांनी शेवटी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.