Homeकोपरगावराज्य पत्रकार संघटनेच्या वतीने महिला दिनी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा सन्मान

राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने महिला दिनी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा सन्मान

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा विविध मान्यवरांच्या शुभहस्ते जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप व शहराध्यक्ष हफिज शेख यांनी दिली आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शनिवार दि ८ मार्च २०२५ रोजी ठीक सकाळी १० वाजता कोपरगाव येथे पंचायत समिती हॉलमध्ये राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली तर संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांचे मार्गदर्शनाखाली नारी शक्तीचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन संस्थेच्या सचिव चैताली काळे,संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुका कोल्हे, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, प्रसिद्ध भागवताचार्य ह. भ.प कविता साबळे, निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पशुधन विकास अधिकारी श्रद्धा काटे, महिला व बालविकास अधिकारी रूपाली धुमाळ तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!