Homeकोपरगावशासनाने महिलांना काळानुसार निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यावे- मा.आमदार.सौ.स्नेहलता कोल्हे

शासनाने महिलांना काळानुसार निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यावे- मा.आमदार.सौ.स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : – “राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई,अहिल्याबाई होळकर, देशाच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रोपदी मुर्मू, अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आपल्या कर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. या महिलांनी स्त्रीत्वाचा समर्पण भाव जागृत ठेवून समाज घडवण्यासाठी योगदान दिले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्या रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे महिला कल्याण व स्त्री सबलीकरण समितीच्या वतीने आयोजित ‘जागतिक महिला दिन’ या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी अॅड.पूनम गुजराथी, पोलीस निरीक्षक मा.श्री. भगवानरावजी मथुरे साहेब, मा.डॉ. मंजुषा गायकवाड, मा. सौ ताराबाई पवार ,कु. गौरी पगारे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतामध्ये मा.आमदार. सौ.स्नेहलता कोल्हे यांनी,“स्त्री- भ्रूण हत्या, बेटी बचाव बेटी पढाओ, महिलांसाठी विविध आर्थिक योजना, बचत गट, स्वसंरक्षण, बलात्कार, महिलाविषयक कायदे बाबतची माहिती सांगून महिलांना स्वतःचे प्रश्न स्वत: सोडवावे लागतील.असे स्पष्ट सांगितले. पूर्वीच्या काळात महिलांमध्ये व्यवहारिक शहाणपण होते. आज स्त्री व पुरुषांनी समान स्तरावर कार्य केले तर कुटुंबाबरोबरच, समाज, देश प्रगतीपथावर जाईल, त्याचबरोबर महिलांकडे मॅनेजमेंट कौशल्ये असते. त्या कौशल्याचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. हे करण्यासाठी महिलांनी कन्फर्ट झोनच्या बाहेर पडावे व टाइम मॅनेजमेंट करून जीवनात यशस्वी व्हावे,असे आवाहन केले.

प्रमुख उपस्थिती असलेल्या अॅड. पुनम गुजराथी यांनी,“स्त्री शिक्षणाचा प्रसार करणारे गोपाळ गणेश आगरकर, रमाबाई रानडे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला. त्याचबरोबर महिला सबलीकरणाविषयीचे कायदे, पोटगीचा कायदा यांची ओळख करून दिली.ही ओळख करून देत असताना महिलांनी या कायद्यांचा गैरफायदा घेऊ नये, असेही आवर्जून सांगितले. त्याचबरोबर आजच्या काळात महिलांना, त्यांच्या अधिकारांची जाणीव होणे गरजेचे आहे.असे प्रतिपादित केले.

कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक मा. श्री.भगवानरावजी मथुरे साहेबांनी महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व उपस्थितांना सुरक्षतेविषयीची जाणीव व जागृती निर्मितीच्या मौलिक सूचना केल्या.

डॉ. मंजुषा गायकवाड यांनी, “कुटुंब व्यवस्थेचा आधारस्तंभ महिला असल्याने महिलांचे निरोगी आरोग्य ही खूप महत्त्वाचे आहे, हे सांगून त्यांच्या आहारातील कमतरता हे कमकुवत आरोग्याचे कारण आहे. त्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे असे स्पष्ट केले.

यावेळी महाविद्यालयाच्या वतीने कु. गौरी पगारे हिचा सा.रे.ग.म. सीजन ५ मध्ये यश प्राप्त केले याबद्दल व मा. सौ. ताराबाई पवार यांचा त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल व कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी कु. गौरी पगारे हिने “दुःख अडवायला उंबऱ्यासारखा” हे गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्यांनी, “प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना महिलांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. महिला सक्षम असेल तर समाज सक्षम होईल, असे आवर्जून सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी मा.सौ. शिल्पाताई रोहमारे, मा. सौ. विद्याताई सोनवणे, मा. सौ. दीपाताई गिरमे, मा. सौ. सुवर्णा गिरमे, मा. सौ. वैशाली आढाव, मा. दगडे भाभी, महिला कल्याण व स्त्री सबलीकरण समितीच्या प्रमुख डॉ.वैशाली सुपेकर, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांसह महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.उज्ज्वला भोर यांनी मानले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सीमा दाभाडे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!