
कोपरगांव: तालुक्यातील काकडी येथील पदमाबाई यादवराव गुंजाळ (७०) यांचे निधन झाले, त्यांच्या मागे पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा विभागातील जमादार बाबासाहेब गुंजाळ यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पार्थीवावर काकडी येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले. याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. कै. पदमाबाई गुंजाळ यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी. आमदार स्नेहलताताई कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे आदिंनी शोक व्यक्त केला.