
कोपरगाव : – कोणत्याही बँकेचे सेव्हिंग अथवा अन्य अकांऊट खाते नागरिकांनी उघडलेले आहे. परंतु, त्या खात्यास आधार किंवा मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल अथवा अन्य कारणास्तव आपले अकांऊट बंद झालेले असेल तर असे अकांऊट चालू करण्याचे अथवा आपल्या अकांउट चालू करण्यासाठी असलेल्या समस्या निवारणासाठी ग्रामीण भागातील खातेधारकांना छत्रपती संभाजीनगर Bob क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ३ महिन्यासाठी म्हणजे १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आपापले अकांऊट खाते पूनर्जीवित करण्यासाठी दि. ८ ऑगष्ट २०२५ रोजी कुंभारी नगरीचे मा. श्री.सतिष भास्करराव कदम यांनी ग्रामस्थांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या अर्थिक समावेशक पूर्ण व्याप्ती मोहिम केंद्राचे कुंभारी येथे छत्रपती संभाजीनगर येथील RBi चे मा. श्री. राजेंद्र कणीशेट्टी सर व Bob रिजनल ऑफिसर मा. श्री. अमोल सोनवणे सर यांच्या हस्ते तसेच BoB कोपरगाव बँच जॉईन्ट मॅनेजर महेश आगजाळ सर, कृषी अधिकारी मंगेश जपे सर, अधिकारी सुमित घोष सर, बीबी को ऑरडिनेटर स्वाती मुलिक मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभारी गावचे जेष्ठ नागरिक व माजी. सरपंच मा. श्री.वाल्मिकराव कबाडी हे होते तर प्रास्ताविक BoB कोपरगाव जॉईन्ट मॅनेजर महेश आगजाळ यांनी केले.


उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संभाजीनगरचे RBi चे मा. श्री. राजेंद्र कणीशेट्टी सर म्हणाले कि, भारतीय रिझर्व बँक सर्व बँकांना कंट्रोल मध्ये ठेवण्याचे मुख्य काम करीत असते, त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगरचे Bob चे रिजनल ऑफिसर मा. श्री. अमोल सोनवणे सर म्हणाले कि, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्पेशल प्रत्येकी एक टिमद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना जनधन खाते, पीएम किसान खाते, लाडकी बहीण खाते यासारख्या अनेकविध प्रकारच्या खात्यास आधार किंवा मोबाईल नंबर लिंक करून सुरळीत चालू करण्याचे काम या केंद्रामार्फत ३० सप्टेंबरपर्यंत केले जाणार आहे. तसेच प्रत्येक खातेधारकाने जीवन ज्योती विम्याचा लाभ घेतला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे सायबर सिक्युरिटी म्हणून आपण मोबाईल द्वारे वापरत असलेल्या सेवा सुविधा अंतर्गत आपणास कोणी फोन करून ओटीपी विचारल्यास मात्र,ओटीपी कोणालाही सांगायचा नाही या सारखे अनेक महत्वाच्या मुद्दयांवर त्यांनी ग्रामस्थांना माहीती दिली.

या कार्यक्रमासाठी कुंभारीसह पंचक्रोशातील महिला, ग्रामस्थांनी

बहुसंख्येने उपस्थित राहुन लाभ घेतला. शेवटी उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार माजी. सरपंच मा. श्री. दिगंबर बढे यांनी मानले .