Homeकोपरगावराज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन--मुकुंद मामा काळे

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन–मुकुंद मामा काळे

कोपरगाव : – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०व्या) जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या महान संतपरंपरेला उजाळा देत आणि नवसर्जनशील प्रतिभेला वाव देण्यासाठी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी राज्यभरातून सर्व कवी-कवयित्रींनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – ₹३००१, द्वितीय क्रमांक – ₹२००१ , तृतीय क्रमांक – ₹१००१ तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक तीन स्पर्धकास प्रत्येकी – ₹५०१ व सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

घेण्यात येणारी स्पर्धा हि नि:शुल्क असून ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ‘या विषयावरील स्व-रचित काव्यरचना असावी व ती दिनांक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत श्री विशाल रघुनाथ गडगे मो. ९७६३७१२३०१ , व श्री संदिप वाघोले सर मो. ९८६०७७७४२२ यांच्या व्हाटसप क्रमांकावर पाठविण्यात याव्या असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मुकुंदमामा काळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!