Homeकोपरगावछायाचित्रकारांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे - जेष्ठ छायाचित्रकार चंद्रकांत कासलीवाल

छायाचित्रकारांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे – जेष्ठ छायाचित्रकार चंद्रकांत कासलीवाल

कोपरगाव – छायाचित्रण व्यवसायात आज अमुलाग्र बदल घडून आले आहे
या व्यवसायात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आली असून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे असे विचार जेष्ठ छायाचित्रकार चंद्रकांत कासलीवाल यांनी व्यक्त केले.

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर एकता ग्रुप व पत्रकार परिषदेच्या वतीने छायाचित्र दिनानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत व प्रास्ताविक महेश नाईक यांनी केले
छायाचित्र दिनानिमित्त रोहित टेके यांनी माहिती दिली.

जेष्ठ छायाचित्रकार ज्ञानदेव भुसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दुर्दैवाने आज काही छायाचित्रकार आपला व्यवसाय करताना व्यसनाधीन होत आहेत त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची मने विचारात घेऊन व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले आहे टेंशन न घेता आपला व्यवसाय सांभाळून ईमाने इतबारे सेवा केली पाहिजे.

जेष्ठ छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की भांडवली खर्च वाढला आहे भ्रमणध्वनी मुळे बाजारपेठ उद्ध्वस्त होते आहे व्यवसायाचे स्वरूप बदलले आहे सर्व छायाचित्रकारांनी एकसारखी दर आकारणी केली पाहिजे अन्यथा गि-हाईकाचा फायदा व छायाचित्रकारांचे आर्थिक नुकसान होते आहे. अरविंद कासार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं असं सांगितलं.

सर्व उपस्थित छायाचित्रकारांना पुस्तक, पुष्प गुच्छ, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त विचारमंथन करण्यात आले. अरुण कदम यांनी आपल्या भाषणात उपक्रमांची माहिती दिली. समारंभासाठी शहर व तालुक्यातील छायाचित्रकार उपस्थित होते. गणपत देवकर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!