Homeकोपरगावशालेय कबड्डी स्पर्धेत संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलने पटकावला तृतीय क्रमांक

शालेय कबड्डी स्पर्धेत संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलने पटकावला तृतीय क्रमांक

कोपरगाव : – कोपरगांव तालुका शासकिय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत एकूण 22 मुलींच्या संघाने सहभाग घेतला होता. त्यात कोपरगांव येथील आदर्श संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या 14 वर्षे गटातील मुलींनी दि. 30 ऑगष्ट 2025 रोजी झालेल्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.

तृतीय क्रमांक पटकावलेल्या शाळेच्या संघाचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष आदरणीय श्री. बिपीनदादा कोल्हे साहेब, प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व संजीवनी कृषि व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष युवा नेते मा. श्री. विवेकभैय्या कोल्हे, शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक मोहसिन शेख सर यांनी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विदयार्थी यांनी अभिनंदन केले. या संघास मार्गदर्शक म्हणून शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.अनुप गिरमे सर व श्री. राहुल रुईकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!