Homeकोपरगावकै.गं.भा. बिजलाबाई बापूराव ( वाल्हयुदादा) कदम यांचे निधन

कै.गं.भा. बिजलाबाई बापूराव ( वाल्हयुदादा) कदम यांचे निधन

कोपरगांव : तालुक्यातील कुंभारी येथील शेतकरी म्हाळसाकांत बापूराव कदम यांच्या मातोश्री कै. गं. भा. बिजलाबाई बापूराव कदम (८०) यांचे दि. १५ /११ /२०२५ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दि. २४ /११ /२ ०२५ रोजी सकाळी ठिक ९ :० ० वाजता गोदातिरी राघवेश्वर देवस्थान कुंभारी येथे होईल.सदर प्रसंगी गावचे भुषण ह.भ. प. नंदकिशोर महाराज देवकर यांच्या सुश्राव्य वाणीतून प्रवचनाचा कार्यक्रम होईल.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे माजी संचालक शिवाजीराव आबाजी कदम यांच्या त्या भावजई तसेच विद्यमान संचालक ज्ञानेश्वर (बापू )भगवंत परजणे ( संवत्सर ) यांच्या त्या मामी तर गणेश म्हाळसाकांत कदम यांच्या त्या आजी होत.

त्यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे आदींनी शोक व्यक्त केला.

         ॥ शोकाकुल॥

म्हाळसाकांत बापूराव कदम ( मुलगा)
जिजाबाई म्हाळसाकांत कदम ( सून)
गणेश म्हाळसाकांत कदम ( नातू )
वनिता सदाशिव काळे ( नात )
संदिप म्हाळसाकांत कदम ( नातू ) व समस्त कदम पा. परिवार कुंभारी.

॥परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवी हिच प्रार्थना.॥ओम शांती॥
॥ भावपूर्ण श्रध्दांजली💐💐॥

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!