
कोपरगांव :- वाढत्या भू वैशमिकीकरण (ग्लोबलायझेशन) मुळे जागतीक स्तरावर पर्यावरणाचे असंतुलन मोठ्या प्रमाणांत वाढत आहे, परिणामी पृथ्वीचे तपमानात वाढ होऊन एल निनो सारखे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे, पर्जन्यमान कमी होऊ लागले आहे, त्यावर झाडे लावा झाडे जगवा हाच सोपा उपाय आहे, पर्यावरण संतुलन काळाची गरज आहे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी संचालक श्री. बाळासाहेब वक्ते प्रास्तविक करताना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांना पर्यावरणाची आवड असून ते प्रत्येक वर्षी देशपातळीवरील नर्सरीतून विविध जातीच्या रोपांची खरेदी करून ती कोपरगांव विधानसभा मतदारसंघात लागवड करून त्याची जपवणूक करतात. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची जयंती, पुण्यतिथी त्याबरोबरच त्यांचा स्वतःचा वाढदिवस कुठलेही हारतुरे सत्कार न स्विकारता वृक्ष लागवड चळवळीवर सातत्याने भर देतात याशिवाय ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे विविध वृक्ष पुरवतात. शाळा महाविद्यालये सोसायटी, ग्रामपंचायत, घराचे कुंपण, शासकीय – निमशासकीय कार्यालये, रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रे-उपकेंद्रे कारखान्यांचे मंडळ कार्यालये आदि ठिकाणी त्यांनी मोफत वृक्ष देऊन ते जतन करतात. वृक्ष लावा-वृद्ध जगवा अभियान त्यांनी संपूर्ण तालुक्यात यशस्वी केले आहे.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी वृक्षारोपण अत्यंत महत्वाचे आहे. चालू वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाळा सर्वांनाच असहय झाला. वृक्षतोड, जंगलतोडीमुळे पर्यावरणास धोका पोहचत आहे. प्रत्येकाने किमान पाच झाडे लावुन ती जगवावी. शेतकरी वर्गाने लिंब, वड, पिंपळ, चिंच, आंबा, करंज आदि प्रकारच्या वृक्षारोपणांवर भर द्यावा. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उसविकास व शेतकी विभागा मार्फत झाडे जोपासण्याचे काम नियमीत केले जाते.
याप्रसंगी संचालक विश्वासराव महाले, साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, श्री. गवारे, ऊस विकास अधिकारी संदीप गवळी, दीपक जपे आदी उपस्थित होते, शेवटी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.