
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे, नगराध्यक्ष पराग जी संधान, माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये ऋतिक अंकुश शेजवळ, वैभव जाधव, सोहम वर्मा, संदीप प्रल्हाद पवार, शुभम मच्छिंद्र कोल्हे, मच्छिंद्र त्र्यंबक कोल्हे यांच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना ॲड. संदीप वर्पे यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्याचाच परिपाक म्हणून विद्यार्थी विविध शासकीय व सुरक्षा दलातील सेवांमध्ये यशस्वी होत असल्याची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.