
कोपरगाव :- राज्यस्तरीय डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत आत्मा मालिक ने यंदाही आपल्या झेंडा फडकवीला.आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरूकुलाच्या तब्बल 132 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. हि संख्या राज्यात सर्वाधिक आहे. सलग अकरा वेळा या शाळेने हि कामगीरी केली. अशी माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.
ते म्हणाले, त्यात राज्य गुणवत्ता यादीत सहा विद्यार्थी, जिल्हा गुणवत्ता यादीत 21 विद्यार्थी तर तालुका गुणवत्ता यादीत 105 विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. त्यात सार्थक जोरवर, वैभवी जाधव, काळे स्वराली, सोहम बेद्रे, श्रेयस नलावडे, अंकित पाटील हे राज्य गुणवत्ता यादीत चमकले. तर भुषण ढोणे , नक्ष दिवे, राजवीर वाबळे, यश गवळी, सार्थक शिंदे, युवराज गर्जे, संकेत सपाटे, शाहू वाघमारे, आशिष बडे, स्वरांजली कानवडे, आराध्या बोर्हाडे, करण चरवंडे, साईराज गोर्डे, रोहित आंधळे, सुजितकुमार गोल्हार, धनेश पाटील, यश कनके , आरव नानेकर, प्रणव केदार, मयंक नाहिरे, हर्ष पवार यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर, तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप व विज्ञान विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल यांनी अभिनंदन केले.