
कोपरगाव : – गणेश सहकारी साखर कारखाना येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून अभिमानाने मानवंदना दिली.भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांचे स्मरण करून त्यांच्या त्याग, शौर्य आणि देशसेवेप्रती कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्य हा आपल्या पूर्वजांच्या त्याग आणि संघर्षातून मिळालेला अमूल्य वारसा आहे. या स्वातंत्र्याचे महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवताना देशाची एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्ये अधिक बळकट करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.तिरंग्याची शान आणि देशाचा अभिमान सदैव उंच ठेवत राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी चेअरमन सुधीर लहारे, व्हाईस चेअरमन विजय दंडवते, संचालक नारायणराव कार्ले, बाबासाहेब डांगे, बाळासाहेब चोळके,विष्णुपंत शेळके, आलेश कापसे,अनिल गाढवे, मधुकर सातव, सौ. अरुंधती अरविंद फोफसे, कार्यकारी संचालक श्री. जी. बी. शिंदे, सर्व खाते प्रमुख, कर्मचारी, सभासद, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.