
कोपरगाव :- कोकमठाण येथील आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील कोच विवेक नायकल यांची स्लोवाकिया येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री टाईल कुस्तीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. भारतीय पैलवानांच्या तयारीसाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरेल. हि उद्यापासून (ता.२०) पासून सुरू होत आहे.
प्रशिक्षक विवेक कोच यांचे वडील भारत नायकल हे देखील आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळीत आहेत. त्यांनीही आंतरराष्टीय कुस्ती स्पर्धत भारतीय संघाच्या प्रशिक्षकत पदाची जबाबदारी यापूर्वी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. विवेक यांच्या निवडीबद्दल बोलताना ते म्हणाले, आत्मा मालिक कुस्ती केंद्रात त्याची जडणघडण झाली. वयाच्या २९ व्या वर्षी त्याला हि मोठी संधी मिळाली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक संघटनेच्या मान्यतेने यास्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या पूर्वी मार्च महिन्यात पार पडलेल्या लेव्हल 2 इंटरनॅशनल कोचींग कोर्स मध्ये त्यांनी एफ श्रेणीत उत्तम यश संपादन केले होते. तसेच 2024 मध्ये अल्बेनिया-युरोप येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत देखील त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. आत्मा मालिक परिवाराच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.