
कोपरगांव : – ग्रामिण भागातील विद्यार्थी खुप हुशार आहेत त्यांनी आपल्या बौध्दीक क्षमतेचा देशहितासाठी वापर करून शासकीय- निमशासकीय योजनांचा तळागाळातील घटकांना कसा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील डाउच बुद्रुक येथील चि. आकाश अर्जुन दहे यांची महाराष्ट्र शासन परदेशी शिष्यवृत्ती अंतर्गत युनायटेड किंगडम येथील ब्रिस्टल विद्यापीठात सार्वजनिक धोरण या विषयात पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुह व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्यावतीने शनिवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी प्रास्तविक केले.
श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणांले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील शेतक-यांसह अन्य मुला-मुलींना दर्जेदार उच्च, अभियांत्रीकी, तांत्रिक, व्यवस्थापकीय, वैद्यकिय, औषधनिर्माण आदि शिक्षण मिळावे यासाठी संजीवनी विद्यापीठाची स्थापना केली त्यातुन देश विदेशात अनेक महत्वाच्या पदावर आमचा संजीवनीचा विद्यार्थी काम करतो याचे आम्हांस भूषण आहे.
चि.आकाश दहे याने फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे पदवी व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नविदिल्ली येथे पुढील शिक्षण घेतले विशेष म्हणजे त्याचे आजोबा बबनराव दहे यांनी देखील याच पध्दतींने शिक्षण घेतले होते. शासन जनतेच्या विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत अनेक योजनांचे निर्णय जाहिर करते, त्याची अंमलबजावणी व होणा-या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी चि. आकाश याला या शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. आज मुक्त अर्थव्यवस्थेत बौध्दीक क्षमतेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामिण भागातील मुले-मुली त्यादृष्टींने अभ्यासात पावले टाकत आहे याचे कौतुक आहे. चि. आकाश दहे याने युनायटेड किंगडमच्या ब्रिस्टल विद्यापिठातुन ज्ञान आत्मसात करून समाजातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, पीकविमा, ग्रामिण विकास, विद्यार्थी शिष्यवृत्ती आदी समस्या सोडविण्यांसाठी मोठे काम करावे असे सांगुन पुढील शैक्षणिक प्रवासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. चि. आकाश याचे वडील अर्जुन दहे हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अग्नीशमन विभागात कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मुलाला शिकवले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री. आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड, त्रंबकराव सरोदे, संजय औताडे, ज्ञानदेव औताडे, राजेंद्र कोळपे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, रमेश आभाळे, मनेष गाडे, विलासराव माळी, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, रमेश घोडेराव, उषाताई औताडे, सोनियाताई पानगव्हाणे, निवृत्ती बनकर यांच्यासह विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले.