
कोपरगाव :- राज्यस्तरीय बाॅल बॅडमिंटन स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवीला. या संघातील आत्मा मालिक गुरूकूलच्या तिन खेळाडूंच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यात हर्षद कडूस, प्रतीक कुलांगे व आदिती घोरपडे यांचा समावेश आहे. हि राष्ट्रीय स्पर्धा छत्तीसगड येथे होणार आहे.

महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन आयोजित ४५ वी सब-ज्युनिअर महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा चंद्रपुर येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या मुलांच्या संघात आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलच्या आयुष कणसे, भावेश सोनवणे, फाईम शेख, प्रतीक कुलांगे, हर्षद कडूस, आदिती घोरपडे, तनुष्का कोरडे व सायली वाघचौरे यांची निवड झाली होती. त्यातून वरील तिन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना प्राचार्य निरंजनजी डांगे, क्रीडा शिक्षक रविंद्र नेद्रे तसेच प्रशिक्षक अभिषेक कुमावत यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, मीरा पटेल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.