Homeकोपरगाववाढदिवसाचेऔचित्य साधतं सिन्नर येथील ८० स्वयंसेवकांनी कोपरगावात राबविले विविध ठिकाणी स्वच्छता अभियान...

वाढदिवसाचेऔचित्य साधतं सिन्नर येथील ८० स्वयंसेवकांनी कोपरगावात राबविले विविध ठिकाणी स्वच्छता अभियान !!

संपादक -राजेंद्र तासकर
आज कोपरगाव शहरात सिन्नर येथून कोपरगाव येथे येऊन सकाळी ७ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ८०ते १०० स्वयंसेवकांनी
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस १४ मे रोजी असल्याचे औचित्य साधून आज 15 मे रोजी प्रतिष्ठानने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले.
डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा ता.अलिबाग जिल्हा रायगड हे एक सेवाभावी व समाजाभिमुख व लोकोपकारी उपक्रम राबविणारेे प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक उपक्रम

सातत्याने राबविले जातात त्यामध्ये स्वच्छता अभियान,वृक्ष लागवड व संवर्धन, जलपुनर्भरण,आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर हे व असे अनेक तसेच गरजूं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवणे,साक्षरता वर्ग चालवणे,विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन असे उपक्रम प्रतिष्ठान मार्फत राबवले जातात.
या स्वछता अभियानात भाग घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचे नाव न कळू देता,कोपरगाव शहरातील बस स्टँड व डेपो परिसर,गोकुळ नगरी ते निवारा कॉर्नर ते खडकी रोड पर्यंत १६००० चौरस मीटर क्षेत्रफळ

असलेले बसस्थानक,२ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून ८ टन कचरा गोळा केला त्यास कोपरगांव नगरपालिका व बस स्थानकचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले,कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.या प्रसंगी मा.नगरसेवक वैभव गिरमे, जनार्दन कदम व बस स्थानक आगार प्रमुख अभिजित चौधरी, नगर पालिकेचे मुख्यधिकारी श्री. शांताराम गोसावी व कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी प्रतिष्ठानचे हे कार्य अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे असे सांगून प्रतिष्ठानच्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या….

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!