Homeकोपरगावसहकारमहर्षी कोल्हे कारखाना कार्यस्थळावरील गणपतीचे संतोषगिरीच्या हस्ते पुजन

सहकारमहर्षी कोल्हे कारखाना कार्यस्थळावरील गणपतीचे संतोषगिरीच्या हस्ते पुजन

कोपरगांव:- सालाबादप्रमाणे याही वर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्यावतींने श्रीगणेशाची हनुमान मंदिरात प्रतिष्ठापना करण्यांत आली असुन त्याची विधीवत आरती व पुजन राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी महाराजांचे परम शिष्य व नाशिक मठाचे प. पू. संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यांत आले.

प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी प्रास्तविकांत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवत असलेल्या विविध धार्मीक उपक्रमांची व भाविकांसह कामगारांच्या मुला-मुलींसाठी राबवीत असलेल्या विधायक योजनांची माहिती दिली. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

प.पु. संतोषगिरी महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा परिसर तपस्वी सहजानंदभारती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव तालुक्यातील पंचक्रोशीतील सभासद, उस उत्पादक शेतकरी, कामगार, व्यापारी व त्यावर अवलंबुन असणा-या असंख्य घटकाच्या कल्याणासाठी संजीवनीची ६६ वर्षापुर्वी स्थापना करत विविध उपपदार्थांची निर्मीती करून देशातील साखर कारखानदारीला उत्कर्षाचा मार्ग दाखविला आहे. त्यांची दुसरी व तिसरी पिढी नाविन्यपुर्ण प्रकल्प राबवुन आर्थीक सक्षमतेचा मार्ग अधिक मजबुत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. श्रीगणेश ही बुध्दीची देवता आहे. हल्लीच्या काळात लहान मुले मुली धार्मिक अध्यात्मीक संस्काराकडे दुर्लक्ष करून भ्रमणध्वनीच्या जास्त आहरी गेले आहेत तेंव्हा प्रत्येक माता-पित्यांने संस्कारीत पिढी घडविण्यांसाठी पुढाकार घ्यावा व सार्वजनिक गणेश उत्सवात जास्तीचा सहभाग देवुन अध्यात्माचे सेवन करावे असे ते शेवटी म्हणांले. संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने त्याचा सत्कार करण्यांत आला याप्रसंगी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, सर्व आजी माजी संचालक, कामगार नेते मनोहर शिंदे, सीओओ शिवाकुमार मोहनदास, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी, विविध संस्थाचे पदाधिकारी, गणेशभक्त, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी आदि उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार वसंत थोरात, भाऊसाहेब गवारे उर्फ खर्डे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!