Homeकोपरगावसहकारी साखर कारखानदारी जगविण्यासाठी ; केंद्र व राज्य शासनांने कोपरगावात क्लस्टर सुरू...

सहकारी साखर कारखानदारी जगविण्यासाठी ; केंद्र व राज्य शासनांने कोपरगावात क्लस्टर सुरू करावे-आमदार विवेक कोल्हे.

उस भावात संजीवनी कधीही मागे राहणार नाही-आमदार कोल्हे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यागी ६४ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न

कोपरगांव :- चालु वर्षी कमी झालेले पर्जन्यमान, खरीपाचे मोठया प्रमाणांत झालेले नुकसान, उंबरठ्यावर उभा असलेला दुष्काळ, पुढच्या वर्षी नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा, एफआरपीच्या तुलनेत साखर विक्रीच्या एमएसपी दरात तर इथेनॉल सहवीज निर्मीती दरात न झालेली वाढ अशा एक ना अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात सहकारी साखर उद्योग सापडला आहे तो जगविण्यांसाठी केंद्र व राज्य शासनांने कोपरगांवात क्लस्टर उद्योग सुरू करून त्यातुन या उद्योगाला मदत करावी अशी कळकळीची मागणी आमदार तथा युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली. बांबू लागवडीसाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी १३ जिल्हयासाठी ५० हजार कोटी रूपये खर्च करण्याबाबतची अंमलबजावणी सुरू केली असुन त्यात अहिल्यानगर जिल्हयाचा समावेश व्हावा यासाठी आपण जाणिवपुर्वक प्रयत्न करणार असल्याचेही सांगून उस भावात संजीवनी कधीही मागे राहणार नाही असेही ते म्हणाले.

सभास्थळी शेतीत आधुनिक तंत्राचा वापर, उस उत्पादन वाढीसाठी सुधारीत वाण, सेंद्रिय जैवीक खते किटकनाशके, पोटॅश खत आदि माहितींचे केंद्र उभारण्यांत आले होते. गोदावरी नदीवरील कोल्हापुर पध्दतीचे बंधारे हायड्रोलिक पध्दतीचे करावे, तालुक्यातील नॉनप्लॅन रस्ते प्लॅन मध्ये घेवुन त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशा विधायक सुचना सभासदांनी केल्याचे अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ६४ वी वार्षीक सर्वसाधारण सभा बुधवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडली त्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. अहवाल सालात दिवंगत झालेल्या मान्यवरांसह सभासदांना यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी श्रध्दांजली वाहिली. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले उपस्थित सभासद शेतक-यांनी इतिवृत्तासह विषय पत्रिकेवरील सर्व एक ते तेरा विषय टाळयांच्या गजरात बहुमताने मंजुर केले.

अहवाल सालात रखमा चांगदेव जानराव (धोत्रे पुर्व हंगामी एकरी ९०.३४ टन), केशव गणेश भूसे (रवंदे आडसाली एकरी ८७.८९ टन), रामदास केशव बोठे (करंजी आडसाली एकरी ८७.३३ टन), सुरेश गंगाधर शिंदे (तिळवणी पुर्व हंगामी एकरी ८३.७९टन), शंकर बाबासाहेब भोसले (संवत्सर आडसाली एकरी ७५.३६ टन), अशोक विठठल वैराळ (वेळापुर खोडवा एकरी ५४.८८ टन), भास्कर गजानन देवकर (टाकळी सुरू एकरी ४१.७६ टन) या सर्वाधिक उस उत्पादन घेणा-या शेतक-यांचा तसेच सुरेश बोळीज, विधीज्ञ संदिप वरपे यांची रयत शिक्षण संस्थेवर मॅनेजिंग कौन्सील सदस्य म्हणुन तर पराग संधान यांची कोपरगांव नगरपालिकेचे नगराध्यक्षपदी निवड झालेबद्दल या सर्वांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रशस्तीपत्रक रोख बक्षिस रक्कम देवुन तर महाराष्ट्र विधानपरिषदेवर आमदार विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही सभासद शेतक-यांच्या वतीने सत्कार करण्यांत आला.

आमदार विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, साखर उद्योगाचे महर्षी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी आजवरच्या साखर धंद्यातील प्रत्येक स्थित्यंतरात मार्ग काढण्यासाठी देशातील उस शेतीसह साखर उद्योगाला दिशा देण्यांचे मोठे काम केले असुन संजीवनीला प्रत्येक कठीण काळात समर्थपणे तारून नेण्यांसाठी पुढाकार घेतला आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली आपण साखर उद्योगासमोरील निर्माण झालेली आव्हाने सोडविण्यासाठी राज्य साखर संघाचा संचालक व या कारखान्याचा अध्यक्ष या नात्यांने प्रामाणिक प्रयत्न करत आहे पण भविष्यात निर्माण होणा-या आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी उपपदार्थ निर्माती, आसवनी प्रकल्प, बायो सीएनजी, पोटॅश खत निर्माती, कृत्रिम बुध्दीमत्तेचा प्रभावी वापर, गाळप क्षमतेत वाढ याबरोबरच आठ महिने बंद राहणारी साखर कारखानदारी बारमाही कशी चालेल यासाठी सोयाबीन, मका सह अन्य शेतमालावर प्रक्रिया करण्याचा उद्योग उभारून सभासद शेतक-यांच्या सहकार्याने कमी पाण्यांत कमी क्षेत्रात अधिक उसाचे उत्पादन, चायना देशातुन येथे स्वस्तात आयात होणा-या रासायनिक उपपदार्थाबाबत जाणिवपुर्वक धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे.

देशातील पहिल्या बायो सीएनजी प्रकल्पाचा पाया संजीवनीने घातला त्यावर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी आपणांस दिल्लीत पाचारण करून त्याबाबतची पार्श्वभूमी समजुन घेत केंद्र स्तरावर कंपनी स्थापन करून त्यातुन साखर उद्योगाला मदत व्हावी यासाठीचे पहिले क्लस्टर कोल्हापुर येथे उभारले जात आहे त्याच धर्तीवरचे दुसरे क्लस्टर कोपरगांवात उभारून त्यातुन साखर उद्योगास मदत करावी.

साखर कारखान्यांचा आयकर माफ करून राष्ट्रीय विकास सहकारी संस्था नविदिल्लीच्या (एनसीडीसी) सहकार्याने कमी व्याजदराचे कर्ज प्रकरणे मंजुर करून राजआश्रय दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे सर्व मंत्री मंडळाचे आपण अभिनंदन करतो आभार मानतो.

संजीवनी युनीट कमांक दोन कर्मवीर काकासाहेब वाघ (रानवड) साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे. टन करण्याचा निर्णय घेवुन त्यासह येथील उस उत्पादक शेतक-यांचे उत्पादन वाढीसाठी थेट बांधावर धडक कृती कार्यक्रम घेत आहे. आगामी सिहंस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभुमीवर येथील गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांनाही त्यांचे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात पश्चिमेचे समुद्राला अतिरिक्त वाहुन जाणारे पाणी वळविण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस आर्थीक तरतुद करावी, ई पीक पाहणींत शेतक-यांनी जास्तीचा सहभाग द्यावा असे सांगुन पुढच्या हंगामात निर्माण होणा-या धोक्याची आमदार कोल्हे यांनी जाणिव करून दिली. कोपरगांव शहरासह ग्रामिण भागातील सुमारे १० हजार घरांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबतचे परिपुर्ण प्रस्ताव लाभार्थ्यांनी भरून द्यावे असेही ते म्हणाले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, अरूणराव येवले, शिवाजीराव बारहाते, पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव वक्ते, त्रंबकराव परजणे, साहेबराव कदम, बाळासाहेब शेटे, दिपक गायकवाड, साहेबराव रोहोम, अशोक औताडे, केशव भवर, राजेंद्र सोनवणे मच्छिंद्र केकाण, दिलीप दारुणकर, संचालक सर्वश्री. बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, रमेश घोडेराव, उषाताई संजयराव औताडे, सोनियाताई बाळासाहेब पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सभासद कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक विलासराव माळी यांनी आभार मानले.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!