Homeकोपरगावशेतकरी पोशिंदा म्हणून त्याच्या मुलभूत समस्या सोडवा,आगामी सिंहस्थ कुंभमेळयातही गोदावरी कालवे लाभधारक...

शेतकरी पोशिंदा म्हणून त्याच्या मुलभूत समस्या सोडवा,आगामी सिंहस्थ कुंभमेळयातही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांची शेती पाण्याने भिजवून द्या अन्यथा पाटपाण्यांच्या लढयासाठी शेतक-यांचा प्रतिनिधी म्हणून आंदोलन करणार- बिपीनदादा कोल्हे

कोपरगांव :-यंदाचा दुष्काळ भयान आहे, १९९२ ची परिस्थिती येथे उदभवली आहे, पुढचा गाळप हंगामावर अनिश्चिततेचे सावट आहे, साखर उद्योग टिकला पाहिजे त्यासाठी एफआरपी बरोबरच एमएसपी, इथेनॉल, सहवीज निर्मातीचे दर वाढले पाहिजे, केंद्र व राज्य सरकारी कर्मचा-यांना महागाईचा निर्देशांक आहे पण शेतक-यांना कुठलाच निर्देशांक अद्याप लागु केलेला नाही, शेतकरी पिचला आहे, त्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर आहे, उर्ध्व गोदावरी खोरे अतितुटीचे आहे त्यासाठी पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळवुन ४० ते ५० टीएमसी पाण्यांची तुट भरून काढली पाहिजे, एल निनोचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्यांने पुढील पर्जन्यमान कसे राहील याचा अंदाज बांधता येत नाही त्यासाठी शेतक-यांनी दहा गुंठ्यात अधिकचे उत्पादन घ्यावे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राधाकृष्ण विखे यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळयात साधु-संतांचे स्नान पर्वणीबरोबरच गोदावरी कालवे लाभधारक. शेतक-यांना पाटपाण्यांची निश्चित आर्वतने द्यावीत अन्यथा शेतक-यांचा प्रतिनिधी म्हणून पाटपाण्यांच्या संघर्षांसाठी आपण आंदोलनाला सज्ज राहु असा स्पष्ट इशारा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिला. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे सत्याग्रही शेतकरी होते. त्यांनी येथील पाटपाण्यांच्या लढयासाठी अनेक जनआंदोलने केली तोच वारसा त्यांचा सुपूत्र म्हणून आपण चालवू असेही ते म्हणांले. शेतकऱ्याला शाश्वत वीज, पाणी आणि हमीभाव द्या असे ते म्हणाले.

‘

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ६४ वी वार्षीक सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली त्यात सभासदांसमोर ते बोलत होते.

श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत त्याच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत त्यात निसर्गराजाने पर्जन्यमाना हात आखडता घेतला आहे, सुरूवातीला येथील खरीपाच्या
पिकाची शेतक-यांना आशा होती पण पावसाने सुमारे अडीच ते तीन महिन्यांचा खंड दिल्याने येथील पिकांची धुळधाण झाली आहे. पुढील दिवस सणासुदीचे आहे खरीप गेले, आता रब्बी हंगाम कसा करायचा याची चिंता त्याला सतावत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतक-यांच्या समस्या सोडविण्यांसाठी जाणिवपुर्वक पुढाकार घेत आहे पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहे. शेतकरी आसमानी संकटामुळे पिचत चालला आहे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला नाही तर कांती होवु शकते, शेतक-याला कुठलीही जात नसते तेंव्हा शासनांने उपग्रहाद्वारे सव्र्व्हेक्षण करून आगामी काळात पाटपाण्यांच्या उपलब्धतेप्रमाणे कुठल्या भागात कोणते पीक घेतायेते याचा थेट सल्ला शेतक-यांच्या बांधावर द्या, पारंपारीक शेती आपण विसरत चाललो आहोत.

खाजगी साखर कारखानदारीला पायघड्या टाकल्याने सहकारी साखर कारखानदारी नामशेष होण्यांच्या मार्गावर आहे त्याला आर्थीक पॅकेज देवुन वाचविले नाही तर त्यावर अवलंबुन असणारी सर्व अर्थव्यवस्था कोलमडून पडेल आणि त्यातुन आणखी संघर्ष वाढेल, बारमाही पाण्यांचे ब्लॉक देतांना शासनने आमच्या जमिनी काढुन घेतल्या पण समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली मराठवाडा विरूध्द नाशिक अहिल्यानगर वादात येथील गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यावर सतत अन्याय केला. ब्लॉकही गेले, पाटपाण्यांची आवर्तने वेळेत मिळत नाही त्यातच निसर्गाचा वरवंटा त्याच्यावर सातत्यने फिरतो आहे तेंव्हा जलसंपदा मंत्री महोदयांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे व पाटपाण्यांच्या समस्येवर समाधानकारक तोडगा काढावा, मोठा मासा छोटया माशाला गिळंकृत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, राजकीय दबावाला बळी पडुन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची पुरेपुर उपलब्धता नसतांनाही गाळप क्षमता वाढविण्यांच्या परवानग्या दिल्या जात आहे त्या सहकारी साखर कारखान्यांचा आत्मघात ठरत आहे असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!