Homeकोपरगावदिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी संगमनेर येथे भव्य मोफत साहित्य वाटप तपासणी...

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी संगमनेर येथे भव्य मोफत साहित्य वाटप तपासणी शिबिराचे आयोजन

कोपरगाव : – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांच्या दुरदृष्टीकोनातून व पुढाकाराने आणि दिव्यांग सारथी संघटना, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक अशी सहाय्यभूत साधन सामुग्री मोफत उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन सुसहाय्य करण्याच्या उद्देशाने संगमनेर येथील मालपाणी लॉन्स याठिकाणी रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठिक १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत साहित्य वाटप व तपासणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व पात्र दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी प्रसिद्दी पत्रकाद्वारे केले आहे.

या शिबिरात दिव्यांग बांधवांसाठी कुबड्या, वॉकर, साधी काठी, अंधकाठी, टॉयलेट खुर्ची, व्हीलचेअर, कानाची मशीन, इलेक्ट्रॉनिक सायकल तसेच इतर आवश्यक साहित्याकरिता तपासणी करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मानेचा पट्टा, कमरेचा पट्टा, पाठीचा पट्टा, वॉकर, काठी, टॉयलेट खुर्ची, व्हीलचेअर, रेल्वे पास व इतर उपयुक्त सुविधांसंदर्भात मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार आहे.

दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविणे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करणे आणि ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने व सुरक्षितपणे जीवन जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

दिव्यांगांचे सक्षमीकरण, ज्येष्ठांचा सन्मान आणि सर्वसमावेशक विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!