Homeकोपरगावकेबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा २९ वर्षांनंतर स्नेहमेळावा, दिवाळीत जुन्या आठवणींना उजाळा.

केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा २९ वर्षांनंतर स्नेहमेळावा, दिवाळीत जुन्या आठवणींना उजाळा.

कोपरगांव :- कोपरगांव येथील कर्मवीर भाउराव पाटील केबीपी विद्यालयात १९९७.९८ या शैक्षणिक वर्षांत दहावी इयत्तेत शिकणा-या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २९ वर्षानंतर नुकताच पार पडला त्यात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोमनाथ परजणे व त्यांच्या मित्र परिवारांनी या मेळाव्याचे आयोजन केले.

जीवाभावाच्या नात्यापेक्षा प्रत्येकाच्या जीवनांत मित्राला विशेष महत्व आहे. शिक्षण घेतांना येणा-या अडचणी सोडविण्यांत त्यांचा त्या काळी असलेला सहभाग किती महत्वाचा होता याची जाणीव अनेकांना यावेळी झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. जाधव सर होते.

स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ही शिकवण देणा-या कर्मवीर भाउराव पाटील यांच्या पुतळ्यास उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला. प्रारंभी कोपरगांव नगरपालिकेत नगरसेवकपदी निवडुन आल्याबददल श्री. वैभव आढाव यांचा सत्कार करण्यांत आला. कोपरगांव औद्योगिक वसाहतहीचे संचालक श्री. सागर शहा यांनी अडचणींतील वर्गमित्रासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. १९९७.९८ मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेत असतांना बरोबरचे सवंगडी विद्यार्थी २९ वर्षानंतर दिवाळीनिमीत्त एकत्र आले त्यामुळे अनेकांच्या जुन्या स्मृती पुन्हा उजळल्या. त्यातुन एकमेकांच्या प्रगतीचा आढावा घेतला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन शिक्षण घेत असतांना व त्यानंतर आयुष्यात काय प्रगती केली याचे सौदाहरण स्पष्टीकरण दिले. शहरासह ग्रामिण भागात राहणा-या मित्र मैत्रीणींना शिक्षणाने समृध्द केले हा धागा या मैत्रीत टिकुन असल्याचे मुख्याध्यापक जाधव सर यावेळी बोलताना म्हणाले. जीवन काय आहे हे समजण्याचे धडे ज्या शाळेने दिले त्याची एकत्रीत सर्वांनीच आठवण ठेवली. कर्मवीर भाउराव माध्यमिक शाळा सरस्वतीच्या प्रांगणांत २९ वर्षानंतर शाळेची घंटा वाजली अन सर्वांच्याच अंगावर शहारे उमटले. हिंगणीचे माजी सरपंच किरण दहे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना अल्पोहार देत पुन्हा पुढच्या वर्षी नव्या उमेदीने एकत्रीत जमायचे हा संदेश घेत या स्नेहमेळाव्याचा निरोप घेतला. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्यातीलच अडचणींत असलेले मित्र व त्याचे कुटूंबियांसाठी एक हात मदतीचा उपक्रम चालु ठेवला असुन त्याचे सर्वच स्तरात कौतुक होत आहे. शाळा बदलली, काळ बदलला, प्रत्येकाचे क्षेत्र बदलले पण मैत्री घटट टिकुन राहिल असा विश्वास या ६१ मित्रांनी याप्रसंगी व्यक्त केला. शेवटी गणेश थोरात यांनी आभार मानले. सोमनाथ परजणे, ज्ञानेश्वर तेलंगे यांनी सुत्रसंचलन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!