
शायना एन. सी. यांच्या कृतीचा शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने निषेध; पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला संताप
कोपरगाव : – शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राची शायना एन. सी. यांनी विटंबना केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

यावेळी शहरप्रमुख गगन हाडा यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत असून, त्यांच्या छायाचित्राची विटंबना सहन केली जाणार नाही, असे सांगितले. तसेच शायना एन. सी. यांच्या कृतीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.

उपजिल्हाप्रमुख अस्लम शेख यांनीही या घटनेचा निषेध केला. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि राजकीय स्वार्थापोटी बाळासाहेबांच्या छायाचित्राची विटंबना करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे यांनी बाळासाहेबांच्या छायाचित्राचा वापर करून सत्ता मिळवणाऱ्यांनी त्यांच्याच छायाचित्राची विटंबना होऊ देणे चुकीचे असल्याचे सांगत, सत्तेसाठी बाळासाहेबांचे नाव वापरू नये, अशी टीका केली.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संजय दंडवते, संपर्कप्रमुख मनोज कपोते, विधानसभा प्रमुख विवेक कुलकर्णी, युवासेना तालुकाप्रमुख विजय गोर्डे, बाळासाहेब मापारी, सुनील माकोने, विठ्ठल निकम, काना हाडा, नंदू निकम, निखिल क्रँकाले, नानासाहेब निकम, हृषिकेश खैरनार, वरून टाक, कुणाल चावरे, विनय टाक, मुन्ना मन्सुरी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.