
कोपरगाव🪐ता. ३० एप्रिल : – रयत शिक्षण संस्थेचे, गुरूवर्य तुकाराम बाबा विद्यालय कुंभारी शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५मध्ये घेण्यात आलेल्या इ.५वी. व इ.८वी. स्कॉलरशिप, इ.८वी. NMMS परिक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.

सारथी शिष्यवृत्ती परिक्षेस १५० पैकी इ. ८ वी. कु. ईश्वरी रिनाकांत कबाडी व कु. ईश्वरी विकास चिने यांनी प्रत्येकी ८५ गुण प्राप्त केले असून या विद्यार्थीनींना प्रतिवर्ष ९६०० रुपये प्रमाणे ४ वर्षासाठी ३८४०० रुपये सारथी शिष्यवृत्ती मिळणार. त्याचप्रमाणे, स्कॉलशिपमध्ये ३०० पैकी


इ.८वी. कु. ईश्वरी रिनाकांत कबाडी १७८, तर इ.५ वी. कु. पुजा जितेंद्र बढे २३०, कु. मयुरी योगेश चौधरी २२२, कु. त्रिवेणी राजेंद्र जाधव २१८, कु. सायली अशोक चौधरी १७८, कु. श्रेया पुरुषोत्तम वहाडणे १७६, चि. प्रियेश भाऊसाहेब थोरात १७८, चि. सादिक आयुब शेख १६६ याप्रमाणे गुण प्राप्त करून स्कॉरशिप मध्ये पात्र झालेले आहे. ही परीक्षा मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी व बुध्दीमता या विषयांसाठी घेण्यात येते या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

या परिक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे मुख्याध्यापक श्री बागुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्कुल कमिटी / सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ आणि उमंग युवा प्रतिष्ठान यांच्या हस्ते १ मे कामगार दिन/ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सत्कार समारंभ संपन्न करण्यात येणार असल्याचे संस्थेचे मुख्याध्यापक श्री बागुल सर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
शाळेच्या वतीने विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वर्षभर विविध उपक्रम, खेळ, स्पर्धा परिक्षा, सराव परिक्षा घेऊन विद्यार्थाची गुणवत्ता पडताळणी केली जाते. त्यातूनच अशा परिक्षांमध्ये विद्यार्थी उज्वल यश संपादन करत आहेत.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. बागुल सर यांसह विषय शिक्षक श्री. पाडवी जी.आर. इंग्रजी, श्री. ताजने. सर. मराठी, सौ. शेख एस.आय. विज्ञान, सौ. देशमुख. एम.एन. बुध्दीमता, श्रीम. होन.एस.जे. गणित यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .