Homeकोपरगावआगामी सर्व निवडणुकीत भाजपाचा विजयी झेंडा फडकणार - साहेबराव रोहोम.

आगामी सर्व निवडणुकीत भाजपाचा विजयी झेंडा फडकणार – साहेबराव रोहोम.

कोल्हे कुटूंबाच्या पाठीशी भाजपा संपूर्ण शक्तीनिशी उभे असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट घेताना केले होते,त्यामुळे राजकीय वर्तुळात फडणवीस व कोल्हे यांच्या माध्यमातून भक्कम असलेल्या कोपरगाव मतदारसंघा बरोबरच अहमनगर जिल्ह्याला अधिक ताकद मिळणार असल्याचे मत जाणकारांनी वर्तविले आहे.

संपादक -राजेंद्र तासकर
भारतीय जनता पार्टीचे गतवैभव प्राप्त करण्याच्या उद्देशाने व २०२४ ला पुन्हा जिल्हाभर भाजपाचे वर्चस्व निर्माण होण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदनगर जिल्हा प्रभारी म्हणून निवड झाल्याने पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी सर्व निवडणूकीत भाजपाचा विजयी झेंडा फडकणार असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व शहराध्यक्ष दत्ता काले यांनी दिली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव अहमदनगर जिल्हा प्रभारी म्हणून जाहीर झाल्यानंतर प्रदेश सचिव सौ.स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभारी होण्याचे स्वागत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात करण्यात आले.
अभ्यासू,कार्यशील व प्रभावी नेतृत्व अहमदनगर जिल्ह्यात मार्गदर्शक म्हणून मिळाले असल्याने भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यात ताकद वाढणार आहे.कोपरगाव मतदारसंघात भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणावर असून स्नेहलता कोल्हे यांनी उभारलेले जनसंघटन,जिल्हा बँकेचे संचालक,युवानेते विवेक कोल्हे यांचे तळागाळातील जनतेसाठी सुरू असलेल्या कामात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन मिळणार असल्याने आगामी काळात घर तिथे भाजप या उद्देशाने कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे.
आगामी सर्व निवडणुकीत घवघवीत यश भारतीय जनता पार्टीच्या पदरात घवघवीत यश कसे मिळेल यादृष्टीने जाणीव पूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे कुशल नेतृत्व पाठीशी असल्याने आगामी काळात भाजपाचा झेंडा सर्वत्र फडकणार आहे.
कोपरगाव मतदारसंघाच्या दृष्टीने असलेले जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी स्नेहलता कोल्हे यांनी विधानसभा सदस्य काळात सातत्याने केलेल्या कामाचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना सातत्याने कौतुक केले व ही विकास कामे मार्गी लागण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी देण्यासाठी सहकार्य केले. आजही त्या लोकोपयोगी कामांच्या वास्तू दिमाखदार पणे शहराचे वैभव खुलवत आहे.त्याच्या कार्यकाळातील निधी मंजूर असलेली असंख्य विकासकामे आजही पूर्णत्वास जात आहेत.
माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे आमचे एक दूरदृष्टी असणारे मार्गदर्शक हरपले आहे.जनतेसाठी आपले दुःख बाजूला ठेऊन लढत राहायला हवे या शिकवणुकीचा आदर्श समोर ठेऊन यापुढे आम्ही सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी हे देवेंद्र फडणवीस,सौ.स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या जोमाने काम करत असून जनतेच्या समस्या सुटण्यासाठी कोपरगाव मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आपले संघटन मजबूतीने पुढे नेणार असल्याचे साहेबराव रोहम व दत्ता काले शेवटी म्हणाले.
या प्रसंगी भाजपा जिल्हा सचिव कैलास खैरे,ता.सचिव श्री.दिपकराव चौधरी,मा. उपनगराध्यक्ष श्री.स्वप्निलजी निखाडे,आरपीआयचे नेते श्री.दिपकराव गायकवाड, संजीवनी शुगरकेनचे संचालक श्री.गोपीनाथ गायकवाड,श्री. महावीरशेठ दगडे,सरचिटणीस श्री.सुशांत खैरे,श्री.रवींद्र रोहमारे, श्री.विष्णुपंत गायकवाड,श्री. मुक्तारभाई पठाण,अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष श्री. खालिकभाई कुरेशी,प्रसिध्दी प्रमुख श्री.जयेशजी बडवे, अनुसुचित जाती जमाती शहराध्यक्ष श्री.शंकरराव बिऱ्हाडे,श्री.निलेश बोऱ्हाडे, ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष श्री.जगदीशजी मोरे,तालुका नाभिक समाजाचे माजी अध्यक्ष श्री.शामराव आहेर,श्री.महेशभाऊ पवार,श्री.अनिल गोडसे,भाजपा कामगार मोर्चा शहराध्यक्ष श्री.सतिषजी चव्हाण,श्री.सागर राऊत,श्री.रमेश भोपे,श्री.गोरख देवडे इ.मान्यवर उपस्थित होते.

        
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!