Homeकोपरगावआत्मा मालिक बाल संस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ

आत्मा मालिक बाल संस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ

कोपरगाव :- संगीत, कला, क्रिडा आणि संस्कार यांचा सुरेख मेळ साधणाऱ्या आत्मा मालिक बाल संस्कार शिबीरास उत्साहात प्रारंभ झाला. कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणीक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात विविध जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक मुले सहभागी झाले आहेत. चाळीसहून अधिक शिक्षक आणि प्रशिक्षक या शिबीरात कार्यरत आहेत.

पहाटे पाच च्या सुमारास योगा प्राणायाम आणि सुर्यनमस्काराने या शिबीरार्थींच्या दिवसास प्रारंभ होतो. तासभराच्या या व्यायामानंतर साडेसात वाजता आयोजित परिपाठात बोधकथा आणि देशभक्तांच्या कार्याची माहिती दिली जाते. किर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते मार्गदर्शन करतात. त्यानंतर दिड तासाच्या कौशल्य विकास तासिकेत अभिनय, संगीत, योगासने, वारकरी भजने यापासून क्रिकेट सह अन्य मैदानी खेळापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते. दुपारी साडे चार ते साडे सहा या कालावधित मैदानी खेळ खेळले जातात. त्यात कब्बडी, खोखो आणि व्हालीबाॅल आदि खेळांचा समावेश आहे. सायंकाळी साडे सात च्या सुमारास भोजन आणि त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

याबाबत माहिती देताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हणाले, राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग हे या शिबीराचे वैशिष्ट आहे. एकदा शिबीराला आलेली मुले पुढील वर्षी आपल्या मित्रांना घेऊन या शिबीरात सहभागी होतात. कला, क्रिडा, संगीत, अभिनय आणि संस्कार या पंचसुत्रीला प्राधान्य दिले जाते. सुजाण नागरीक घडविण्याच्या दृष्टीने अशी शिबीरे उपयुक्त ठरतात.

संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्वस्त प्रदिप भंडारी व प्रकाश गिरमे यांनी शिबीरास भेट देऊन शिबीरार्थीं सोबत संवाद साधला. प्राचार्य सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, मिराताई पटेल, आत्मदर्शन बागडे, प्राचार्य निरंजन डांगे व प्राचार्य माणिक जाधव शिबीर यशस्वी व्हावे यासाठी परिश्रम घेत आहेत.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!